(दिलीप धोत्रे यांच्या हस्ते झाले रुग्णवाहिकेचे लोकार्पण)
सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकारमंत्री दिलीप बापू धोत्रे यांनी, या कोरोणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये, सर्व गोरगरीब व गरजू रुग्णांना तात्काळ रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी मदत व्हावी यासाठी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे एका रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
सतत सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असणारे दिलीप बापू धोत्रे यांनी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे रुग्णवाहिका लोकार्पण केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना दिली बाप्पू धोत्रे यांनी सर्व उपस्थित नागरिकांना आवाहन केले की पुरणाच्या काळामध्ये सर्वांनी एकमेकांची मदत केली पाहिजे व सर्वांना सहकार्य केले पाहिजे त्याचबरोबर या रुग्णवाहिकेचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा असे यावेळी बापू धोत्रे म्हणाले;
या कार्यक्रम प्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, मोडनिंब चे उपसरपंच दत्ता बापू सुर्वे, सिद्धेवाडीचे उपसरपंच दाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे,सोमनाथ माळी सदाशिव पाटोळे,प्रवीण खडके, राजू निंबालकर,अजित खडके, महादेव मांढरे, राहूल सुर्वे, किरण खडके, निखिल गिड्डे, फिरोज मुजावर, दीपक गिड्डे,इत्यादी उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.