सोलापूर // प्रतिनिधी
ममहाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कलाकारांना सर्वतोपरी मदत करणार अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे कला व सांस्कृतिक मंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख यांनी कलाकार संघटनेच्या प्रतिनिधींना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलले.
महाराष्ट्रातील कलाकारांच्या अडचणी व होत असलेले हाल बाबत महाराष्ट्रातील सर्व कलाकार संघटना व जेष्ठ कलाकारांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे केली आहे . त्याच प्रमाणे महाराष्ट्र कलाकार सेनेच्या वतीनेही अनेकवेळा निवेदनाद्वारे कलाकारांना मान द्या , सन्मान द्या त्याच बरोबर वृध्द कलाकारांना मानधन, युवक कलाकारांना प्रोत्साहन तर ज्यांचे पुर्णपणे रोजीरोटी कलेवरच अवलंबुन आहे . अशांना त्यांना आधार द्या . आणि भविष्यात त्यांचे होणारे हाल नाहीसा करा . अशी मागणी करण्यात आले . त्याच बरोबर बँन्ड पथक कलाकारांकडे लक्ष द्या . अशी मागणी कलाकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी केले व करीत आहेत . त्या वरून मा . कला व सांस्कृतीक मंत्रालयाकडून दि . १० मे रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील सर्व कलाकार संघटना व जेष्ट कलाकारांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मा . ना . श्री . अमित देशमुख साहेब यांनी घेतली . या बैठकीत महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र कलाकार सेनेचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी या बैठकीत भाग घेऊन कलाकारांच्या अनेक अडचणी व कोरोना महामारीमुळे होत असलेले अत्यंत वाईट परिस्थितीची माहिती दिली . यावर मा . मंत्री महोदयांनी आपल्या सर्व सुचना व मागण्याकडे आम्ही जरूर विचार करू असे आश्वासन दिले .
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत विष्णु कारमपुरी (महाराज), उदय सारम, शाहिर (दादा) पासलकर , रत्नकांत जगताप , प्रदिप कबरे , अनिल मोरे , बाळासाहेब गोरे , सुनिल साबळे , शिवाजी पाटील , मुसळे साहेब , रघुभाऊ खेळणार , विशाल शिंगाडे , विलास पाटील , संभाजी जाधव , शाहिद परादे आणि अनेक जेष्ठ कलावंत संचालक , संबंधित खात्यातील सचिव आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते .
महाराष्ट्र राज्याचे कलाव सांस्कृतिक मंत्री मा. ना. श्री. अमितजी देशमुख यांनी कलाकारांना सर्वतोपरी मदत करणार असे कलाकारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीत व्यक्त केले . या व्हिडिओ कॉन्फरन्स प्रसंगी महाराष्ट्र कलाकार सेनेचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) व कलाकार आदि उपस्थित होते .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.