पत्रकार सुरक्षा समितीचा पुरस्कार सोहळा कार्यक्रम




सोलापूर // प्रतिनिधी 

समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व प्रसिद्धी माध्यमापासून दूर असलेल्या व्यक्तीना पत्रकार सुरक्षा समिती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते यंदा चे 4थे वर्ष असून यावर्षी आदर्श पत्रकार म्हूणन दैनिक लोकप्रधान चे संपादक आयाज शेख  आन्सर तांबोळी राजू बंडगर हरी भिसे तर आदर्श विधीज्ञ म्हूणन ऍड अजमोद्दीन शेख यांना दैनिक लोकप्रधान कार्यालयात पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मान पत्र शाल देऊन तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला

*पत्रकार सुरक्षा समितीचे काम कौतुकास्पद*- जमीर शेख

पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांच्या प्रश्नावर अनेक वर्षापासून आंदोलन उपोषण निवेदन च्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सरकारी दरबारात मांडत असून पत्रकारांसाठी नेहमीच संघर्ष करणारी संघटना असल्याचे प्रहार चे जमीर शेख यांनी यावेळी सांगितले

*पत्रकारांना कायदेशीर माहिती असायला हवी*

अजमोद्दीन शेख

पत्रकार हा समाजाचा मुख्य घटक असून अनेक वेळा पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होत असतात समाजातील जडण घडणं बाबतीत पत्रकारांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे पत्रकारांना कायदेशीर ज्ञान आवश्यक असल्याचे मत आदर्श वकील म्हूणन पुरस्कार मिळालेले ऍड अजमोद्दीन शेख यांनी या कार्यक्रम प्रसंगी सांगितले

सदर कार्यक्रम चे सूत्रसंचालन प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केले असून आभार प्रदर्शन लोकप्रधान चॅनल चे अकबर शेख यांनी केले होते

यावेळी अक्षय बबलाद वैजिनाथ बिराजदार इस्माईल शेख डॉ रवींद्र सोरटे तानाजी माने दत्ता फाळके जितेंद्र भोसले राजाभाऊ पवार आमीर तांबोळी विशाल जाधव प्रमोद तूपसमुद्रे सिद्धार्थ भडकुंबे उपस्थित होते

दैनिक लोकप्रधान कार्यालयात हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दैनिक लोकप्रधान व लोकप्रधान चॅनल च्या सर्व टीम ने परिश्रम घेतले आहे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget