कामगार सेनेच्या वतीने गोरगरीब व गरजूंना धान्य वाटप




सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गोरगरीब व गरजू विडी , यंत्रमाग व असंघटीत कामगारांना कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल यांच्याहस्ते धान्य वाटप करण्यात आले. 

कोरोना महामारी मध्ये विशेष करून विडी , यंत्रमाग व असंघटीत कामगारांचे उपासमार होत आहे . म्हणून शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गरीब व गरजू विडी व यंत्रमाग कामगारांना प्रत्येकी १० किलो गहू , तांदूळ कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . 

याप्रसंगी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) , विठ्ठल कुन्हाडकर , प्रशांत जक्का , श्रीनिवास बोगा , गणेश म्हंता ,पप्पु शेख , शोभा पोला , अनिता बटगिरी , नागार्जुन कुसूरकर , लक्ष्मीकांत कोडम , संतोष जाधव यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget