सोलापूर जिल्ह्याबरोबरच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात रेमडिसीवर इंजेक्शंन, ऑक्सीजन व लसीकरण पुरवठा वाढवून वितरणाचे प्रशासनामार्फत योग्य नियोजन व्हावे-आ.प्रशांत परिचारक



 

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेवून रेमडेसीवर इंजेक्शन व ऑक्सिजन, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा वाढीव पुरवठा करणेबाबत मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व जिल्हा प्रशासनाकडे याचेंकडे आ.प्रशांत परिचारक यांनी लेखीपत्राव्दारे मागणी केली आहे.


सध्या सोलापूर जिल्ह्यात कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असून रूग्ण संख्येतही वाढ होत आहे. रेमडेसीवर इंजेक्शन व ऑक्सिजन, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा कमी मिळत आहे. दररोज पंढरपूरात रूग्णसंखेचे तुलनेत 350 ते 400 रेमडेसीवरची गरज आहे, पंरतू त्यामध्ये फक्त 100 रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. तसेच ऑक्सीजन पुरवठाही नियमीत होत नाही. त्यामुळे अनेक रूग्ण उपचाराअभावी मृत्यू पावत आहेत. सोलापूर जिल्ह्यास दररोज 2500 ते 3000 लसीचा पुरवठा होण्याची गरज आहे, पण महाराष्ट्र शासनाकडून जिल्ह्यामध्ये फक्त 1000 ते 1200 लसीचा पुरवठा केला जातो. त्यामधून पंढरपूर तालुक्यासाठी फक्त 100-200 लस उपलब्ध होत आहे.


दररोज ऑनलाईन नोंदणी करूनही कोविडची लस उपलब्ध होत नसल्याने नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. ज्या नागरीकांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे अशा नागरीकांना तालुकास्तरीय आरोग्य प्रशासनाकडून एसएमएस अथवा संपर्क करून त्यांना लस घेणेसाठी लसीकरण केंद्रावर निमंत्रीत करणेत यावे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी नागरीकांची गर्दी, गोधंळ व प्रशासनाबाबत होणारा संभ्रम दूर होईल. लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सींगचे पालन होत नसल्याने कोरोना रूग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 5-6 तास वयोवृध्द नागरीक केंद्रावर रांगेत उभे राहूनही त्यांना लस मिळत नाही. वास्तविक पहिला डोस झालेनंतर 45 ते 60 दिवसात दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे, परंतु वेळेत दुसरा डोस उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा डोस घेणारे नागरीक गर्दी करीत आहेत. यावर उपाय योजना म्हणून पहिला डोस घेणेसाठी 30% नागरीक व दुसरा डोस घेणेसाठी 70% नागरीक बोलावणेत यावेत. सध्या ज्येष्ठ नागरीकांनी यापुर्वी घेतलेला पहिला लसीचा डोस घेवून सुमारे 60 दिवस होत आले आहेत.


यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यासाठी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाढती रूग्णसंख्या पाहून लस पुरवठा वाढवावा व जेवढ्या लस लसीकरण केंद्रावर उपलब्ध होतात त्याची यादी प्रशासनामार्फत दैनंदिन जाहीर करावी. लसीकरण केंद्रावर ऑनलाईन नोंदणीकृत केलेल्या नागरीकांना लसीकरण करणेत यावे. तसेच सोशल डिस्टन्स, सॅनिटायझेशन, पोलीस बंदोबस्त व लसीकरणाबाबत मार्गदर्शन आदी सुविधा देवून नागरीकांना त्रास होणार नाही याची दखल घेतली जावी.  अशा प्रकारच्या मागण्या आ.प्रशांत परिचारक यांनी शासनाकडे केल्या आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget