करमाळा तालुक्यातील फिसरेत दुर्मिळ गजरा (Smooth Snake) सापाला वाइल्ड अनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीच्या सर्परक्षक साईचंद्र फडतरे मुळे जीवदान.


सोलापूर // प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील नागेश बापूराव चव्हाण यांच्या शेततळ्यात आज 12 मे रोजी तीन साप आढळून आले व त्यांनी लगेच  सर्परक्षक साईचंद्र फडतरे यांना संपर्क केला असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले प्राण्यांवर चे असलेले नितांत प्रेम दाखवत घटनास्थळी येऊन तिन्ही सापाला पकडून वन विभागाच्या साह्याने निसर्गाच्या सानिध्यात सोडले. गेल्या काही दिवसांमध्ये याच शेततळ्या मधून तब्बल 6 विषारी सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यमध्ये सर्प रक्षक साईचंद्र यांनी सोडून जीवदान दिले आहे. गजरा हा दुर्मिळ प्रजाती चा साप असून हा बिनविषारी आहे, त्याची लांबी दोन ते तीन फूट असते, गजरा साप आढळून येण्याचे प्रमाण कमी आहे. या सापाच्या शरीरावरील खवले अत्यंत गुळतगुळीत असतात. त्यामुळे जमिनीखालच्या दगडांमधून व अरूंद बिळांमधून सहजसुलभ हालचाल करता येते. याचा रंग तपकिरी, काळपट असतो, गडद तपकिरी रंगावर तोंडापासून एक तृतीयांश भागापर्यंत पुसट पांढरी नक्षी असते. हा साप लाजाळू असून सहसा चावत नाही अशी माहिती साईचंद्र यांनी आपल्या  चॅनल शी बोलताना दिली. आपल्या चॅनल च्या माध्यमातून त्यांनी लोकांना असे आवाहन केले की गावात कोणत्याही प्रकारचा साप आढळून आल्यास त्याला मारू नये. त्यावर लक्ष ठेवून त्वरित सर्परक्षकाशी संपर्क साधावा, सापाला मारण्याचा प्रयत्न केल्यास शासनाकडून अधिनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई पण होऊ शकते हेही त्यांनी नमूद केले. साईचंद्र फडतरे यांचे पंचक्रोशी मध्ये लोकांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे कारण ते फक्त पंचवीस वर्ष वयाचे असून कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता अगदी स्वखर्चाने जाऊन सापांना जीवदान देण्याचे काम करत आलेले आहेत. यापुढेही कधी कुणाला साप आढळून आला त्याला मारू नका असे आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी लोकांना केले व संपर्क साधण्यासाठी त्यांचा नंबर दिला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget