सोलापूर // प्रतिनिधी
पुळूज ता. पंढरपूर येथे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी नुकतेच एक कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरमधेच गरज लक्षात घेऊन दहा ऑक्सिजन बेडची सुविधा सुद्धा पुरविण्यात आली.
पुळूज पंचक्रोशीतील कोव्हिड पाॅजिटिव्ह लोकांची अतिशय चांगली सोय झाली. कारण यापूर्वी अशा कोव्हिड पाॅजिटिव्ह व्यक्तीला पंढरपूर किंवा सोलापूर येथे पोहोचण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र पुळूज प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हिड केअर सेंटर दहा ऑक्सिजन बेडसह सुरू झाल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला. व संबंधित कोव्हिड पाॅजिटिव्ह पेशंट याठिकाणी येऊन अॅडमीट होऊ लागले व उपचार घेऊ लागले खरे, पण या पेशंटसाठी जेवणाची व्यवस्था नव्हती. व सदर पेशंटच्या नातेवाईकांना डबा पुरवावा लागत होता. त्यामधे बरीच जोखीम होती. ही गरज लक्षात घेता पुळूज येथील सुशीलभैय्या क्षीरसागर मित्र मंडळ या तरूण मंडळाचे कार्यकर्ते मोहोळ नगरपालिकेचे नगरसेवक मा श्री सुशीलभैय्या क्षीरसागर यांना भेटले व त्यांना सदर कोव्हिड केअर सेंटरला भेट देण्यासाठी आल्यानंतर येथील पेशंटची असलेली जेवणाची अडचण, त्यामुळे होणारे रुग्णांचे हाल, घरच्यांची होणारी धावपळ व स्वीकारावी लागणारी जोखीम ही सर्व परिस्थिती सुशीलभैय्यांच्या कानावर घातली. अडचण व गरज समजताच सुशीलभैय्या क्षीरसागर यांनी क्षणाचाही विलंब न लावता उद्या पासून दररोज दोन वेळचे जेवण सर्व पेशंटला देण्याची जबाबदारी कालच स्वीकारली व आज सकाळी ताबडतोब पुळूज येथील कोव्हिड केअर सेंटर मधील सर्व रूग्णांना स्वखर्चाने दोन वेळचे सकस व पौष्टिक जेवण पाठवून दिले. दोन भाज्या, भात, पोळी, वरण, उसळ, सॅलेड असे उत्तम प्रतिचे, ताजे, सकस, व रूचकर जेवण आज सकाळी पुळूज येथे पोहोचले. असेच सुंदर जेवण गोड पदार्थ किंवा अंडी यासह संध्याकाळी येणार असल्याची माहिती मिळाली. अन्नदानाचे पवित्र कार्य योग्य वेळी व परिस्थितीनुरूप योग्य ठिकाणी करत असल्याबद्दल श्री सुशीलभैय्या क्षीरसागर यांचे पुळुज पंचक्रोशीत व पुळुज गावात सर्वजण कौतुक करत आहेत. आज सकाळी आलेले जेवण वाटत असताना पुळूज येथील सुशीलभैय्या क्षीरसागर मित्र मंडळ चे सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे,. सरपंच शिवाजी शेंडगे. पांडुरंग ताटे . माणिक बाबर तलाठी गायकवाड. ग्रामसेवक आर पी कोळी .राजू माने. शिवाजी सलगर .संजय मामाने . माणिक शिंदे . विश्वास सावंत. आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी व विशेषतः पेशंट व त्यांच्या नातेवाईकांनी सुशीलभैय्यांचे मनापासून आभार मानले.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.