सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांची मा. जिल्हाधिकारी सोलापूर व आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सोलापूर // प्रतिनिधी
या निवेदनाद्वारे सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी अशी मागणी केली आहे की, दिनांक 16 मे 2021 पासून लोधी गल्ली व लष्कर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आणि त्या भागातील नागरिकांची अँटीजन टेस्ट तपासणी चालू आहे. तेथील दाट वस्ती असून नागरिकांची संख्या मोटठी असून अँटीजन टेस्ट तपासणी अतिशय संथ गतीने चालू आहे. आधीच लॉकडाऊन सुरू असून नागरिकांच्या हाताला काम नाही, रोजी रोटी चे हाल सुरू आहेत या भागातील नागरिक बहुतेक कष्टकरी असून त्यांना काम केल्याशिवाय घर चालविणे मुश्कील आहे. कंटेन्मेंट झोन केल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून लोधी गल्ली व लष्कर भागातील नागरिकांना कंटेन्मेंट झोन मधून वैद्यकीय सुविधा, भाजीपाला, दूध यासाठी शिथिलता द्यावी. तसेच संथ गतीने चालू असलेली अँटीजन टेस्ट करण्याची संख्या आणि गती वाढवून लवकरात करावी आणि कंटेन्मेंट झोन मधून लोधी गल्ली व लष्कर भागाला मुक्त करावे. असे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर व मा. आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे ईमेलद्वारे निवेदन देऊन केली आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.