वेळीच उपचारघेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमीकान, नाक,घसा तज्ज्ञ डॉ. संजय मंठाळे यांचे मत

 


 

सोलापूर // प्रतिनिधी 

सध्या कोविड-19 च्याआजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हाआजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचारघेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी असल्याचे मत कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजयमंठाळे यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्गाबरोबरच म्युकर मायकोसिस आजारानेरुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरेझालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. हे एक फंगल इन्फेक्शन असून तेसाधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. कोरोनातून बरेझालेल्या रूग्णांना हा आजार दोन ते सहा आठवड्यापर्यंतहोऊ शकतो. म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आणखी काही दिवस काळजी घेणे गरजेचेआहे. वेळीच उपचार केले नसल्यास रूग्ण दगावण्याची शक्यता 50 टक्के असल्याचेही डॉ.मंठाळे यांनी सांगितले.  कोरोना रूग्णांनी सकस आहार घ्यावा, कोवळ्या उन्हातथांबावे, व्यायाम, प्राणायम करावेत. पाणी भरपूर प्रमाणात प्यावे आणि सर्दी होणारअसे पदार्थ खाणे टाळावे. मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असलेल्या ठिकाणी रहावे,असेही डॉ. मंठाळे यांनी सांगितले. मधुमेह रूग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आजाराची लक्षणे·        नाक बंद पडणे, नाक गळणे, लालसर किंवाकाळा स्त्राव येणे.·        गालावर सूज येणे, बधीरपणा येणे.·        तीव्र डोकेदुखी.·        वरच्या जबड्यातील दात हलणे,जबड्यातील दात पडून पू येणे.·        वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्याभागाला छिद्र पडणे.·        जबड्याची टाळू व नाकातील त्वचेचा रंगकाळसर होणे.·        नाकाच्या भागाला काळसर ठिपके पडणे.·        डोळ्याच्या आजूबाजूला, सायनसच्याआजूबाजूचा भाग सुजणे.वरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरकडून तपासून उपचारघ्यावेत.  प्रतिबंधक उपाय·        डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार नियमित घेणे.·        रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवाररक्तातील साखर तपासून नियंत्रणात असल्याची खात्री करावी. रक्तातील साखर असल्यासडॉक्टरांचा सल्ला घ्यावा.·        डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाकातबेटाकीन्ड रेडी 0.5 टक्के सोल्यूशनचे (पोविडन-आयोडिन) दोन ते तीन थेंब दिवसातूनतीन-चार वेळा टाकावे. ·        बेटाकीन्ड रेडी नाकात टाकण्यापूर्वीसोल्सप्रे नसल स्प्रे किंवा नॅसोमिस्ट नसल ड्रॉप्स नाकात टाकावे.·        बेटाकीन्ड रेडी किंवा बेटाडिन ओरलसोल्यूशनने दिवसातून दोनवेळा गुळण्या करणे.·        माती आणि धुळीच्या थेट संपर्कात येऊनये.·        शेत, बगिचा किंवाबांधकामाच्या ठिकाणी संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडेघालणे. ·        त्वचेवर जखम असेल तर साबण आणिपाण्याने स्वच्छ करावे. ·        मास्कचा नियमित वापर करावा.·        घरात बुरशी जमा होणार नाही याचीकाळजी घ्यावी.·        वास येणारे, खराब अन्न टाकून द्यावे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget