सोलापूर // प्रतिनिधी
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ काँग्रेस नेते, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खासदार श्री राजीवभाऊ सातव यांचे आकस्मित दुःखद निधन झाले होते. आज रोजी कॉंग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्व. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी श्रद्धांजली वाहताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की काँग्रेसचे खासदार राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांनी मृत्यूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
यावेळी कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश सरचिटणीस अलकाताई राठोड, अनुसूचित जाती प्रदेश सरचिटणीस नितीन शिवशरण, मागासवर्गीय सेल अध्यक्ष उमेश सुरते प्रदेश ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, राहुल गोयल, राहुल वर्धा, मुश्ताक बेंनिशिरूर, पशुपती माशाळ, किसन मेकाले गुरुजी, नागनाथ कदम, अनिल मस्के, तिरुपती परकीपंडला, बसवराज म्हेत्रे, हारून शेख, साहेब कडेचुर, लक्ष्मीनारायण दासरी, सुनील व्हटकर, अनुपम शहा, चक्रपाणी गज्जम, मल्लिनाथ सोलापुरे, प्रमिला तुपलवंडे, श्रद्धा हुल्लेनवरू, रजाक कादरी, मोनिका सरकार, शोहेब हत्तुरे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, शाहू सलगर, मेघश्याम गौडा, भुजंग लांबतुरे, नितीन नारायण, करीम शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.