सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन, व अन्नधान्य, मास्क, वाटप, जेवण वाटप कार्यक्रम संपन्न




सोलापूर // प्रतिनिधी 

भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने कॉंग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच "मदतीचा एक घास" अंतर्गत जेवण वाटप व अन्नधान्य मास्क वाटप करण्यात आले.


यावेळी कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश सरचिटणीस अलकाताई राठोड, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, पशुपती माशाळ, किसन मेकाले गुरुजी, नागनाथ कदम, अनिल मस्के, नितीन शिवशरण, राहुल गोयल, उमेश सुरते, मुश्ताक बेंनिशिरूर, तिरुपती परकीपंडला, राहुल वर्धा, बसवराज म्हेत्रे, हारून शेख, साहेब कडेचुर, लक्ष्मीनारायण दासरी, सुनील व्हटकर, अनुपम शहा, चक्रपाणी गज्जम, मल्लिनाथ सोलापुरे, प्रमिला तुपलवंडे, श्रद्धा हुल्लेनवरू, रजाक कादरी, मोनिका सरकार, शोहेब हत्तुरे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, शाहू सलगर, मेघश्याम गौडा, भुजंग लांबतुरे, नितीन नारायण, करीम शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget