प्रशासनाने हट्ट सोडावे. विडी कारखाने चालू करावे.




सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना लॉकडाउनमध्ये यंत्रणा राबविताना प्रशासन “वर्क फ्रॉम होम" संकल्पना मान्य करते . विडी वळण्याचे काम विडी कामगार आपापल्या घरात बसून करतात . त्यामुळे प्रशासनानी हट्ट सोडावे व विडी कारखाने त्वरीत चालू करण्याचे आदेश द्यावेत . विडी कामगार सध्या ज्या आर्थिक संकटातून जात आहेत , त्याचे वस्तुस्थिती प्रशासनापुढे मांडावे व विडी कारखाने त्वरीत चालू करण्यास भाग पाडावे. अशी मागणी सोलापूर विडी कामगार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळांनी सहाय्यक कामगार आयुक्त श्री . निलेश येलगुंडे यांची समक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली . या शिष्ठमंडळात महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज), महाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष :- अनिल पल्ली, नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळ्ळी, राष्ट्रीय विडी मजदूर संघ (इंटक) चे सचिव :- राहुल गुजर, सोलापूर शहर काँग्रेस विडी - यंत्रमाग कामगार सेलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी या पाच कामगार संघटनाचा समावेश होता.

       

विडी कारखाने बंद असल्याने हजारो विडी कामगार हक्काची रोजगारी गमावून बसले आहेत . त्यांना उपाशीपोटी राहावे लागत आहे . दररोज आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागत आहे . म्हणून तातडीने विडी कारखाने चालू करावेत यासाठी आपण शासन , मा . जिल्हाधिकारी , म.न.पा.आयुक्त , यांचेकडे तातडीने शिफारस करावी . अशी मागणी सहा . कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

मा . मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे , मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार , मा. कामगारमंत्री श्री . हसन मुश्रीफ , मा . कामगार राज्यमंत्री मा. बच्चु कडू, मा. पालकमंत्री मा. दत्ता (मामा) भरणे यांना यापुर्वीच ई मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे . 

विडी कामगार संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सो.म.न.पा. समोर , विडी मालक संघाचे कार्यालयासमोर यापूर्वी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले आहे . मागण्या मान्य होईपर्यंत दररोज . एका कार्यालयासमोर यापुढेही आंदोलन सुरूच राहणार आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget