सोलापूर शहरात किमान ६० ते ७० हजार विडी कामगारांना रोजगारी देणारे विडी कारखाने त्वरीत चालू करा या मागणीसाठी चार कामगार संघटना एकत्रित येऊन दररोज एक चौकात धरणे आंदोलन करणार आहेत . या धरणे आंदोलनाची सुरुवात मंगळवार दि . १८/०५/२०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळ ११ ते दुपारी १ या वेळेत करण्यात येणार आहे . दि . १५/०४/२०२१ लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मागील ४५ दिवसापासून विडी कारखाने बंद असल्याने विडी कामगार अक्षरशः उध्वस्त झाले आहेत . शासन एकीकडे "वर्क फ्रॉम होम" संकल्पना मान्य करतौंग आणि दुसरीकडे विडी कामगार महिला घरी बसून विडी वळविण्याचे काम करीत असतांना देखील शासन विशेषतः सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त हे परवानगी देत नाहीत . हा विरोधाभास दिसून येत आहे . यामध्ये महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस :- विष्णु कारमपुरी (महाराज) ,महाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष :- अनिल पल्ली , नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष :- सायबण्णा तेग्गेळ्ळी व राष्ट्रीय विडी मजदूर संघ (इंटक) चे सचिव :- राहुल गुजर हे सहभागी होणार आहेत . दररोज एक चौक याप्रमाणे दत्तनगर , शास्त्रीनगर, साईबाब चौक, जुना विडी घरकुल, भवानी पेठ, जुना अक्कलकोट नाका, सुनिल नगर, निलम नगर, कन्ना चौक असे विविध चौकात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.