राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आ.शहाजी पाटील यांचा हल्लाबोल!



(रक्तरंजित आंदोलनाला मी तयार आहे:- आ. शहाजीबापू पाटील)


सोलापूर // प्रतिनिधी

मुख्यमंत्री पदाच्या काळात शरद पवार यांनी एकाच दिवशी 9 Midc फक्त पुणे जिल्ह्यात देऊन टाकल्या,उजणीचे पाणी बारामतीच्या औद्यागिक वसाहतीला नेलं,उजणीचे पाणी बारामतीला पिण्यासाठी नेलं, उजणीचे पाणी सीनारमास प्रकल्पाला बारामतीलच नेलं म्हणजे पूर्वी तुमी उजणीचे पाणी बारामतीला भरभरून घेऊनच गेलाय आणि राहिलेलं 5 Tmc म्हणजे धरणंच पुण्याला घेऊन जावा, जिल्यात धरणं कशाला ठेवताय,धरण- बिरण वळवायची काही यंत्रणा असेल तर पवार साहेब,अजितदादा व भरणेमामा  धरनच वळतील व पुण्याला घेऊन जातील. पण सुदैवाने अजून यंत्र मिळाले नाही ते त्यांच दुर्दैव आहे अशा जोरदार हल्लाबोल आ. शहाजीबापू पाटील यांनी केला.


  उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दीपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जागृती सुरू केली आहे. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगोल्याचे शिवसेना आ. शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहूद येथील निवासस्थानासमोर  हलगीनाद आंदोलन केले. यावेळी  आ. पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूर तालुक्‍याला पाच टीएमसी पाणी देण्यास तीव्र



या वेळी पुढे बोलतांना आ. पाटील म्हणाले की,बारामतीकरांना ज्या ज्या वेळेस सत्ता मिळाली त्या वेळेस शरद पवार साहेबांनी  बारामती साठी अनेक विकासाच्या भरभरून योजना राबविल्या आहेत. एका बाजूला  महाराष्ट्राचे नेते म्हनून शरद पवार साहेबांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला सत्ता मिळाल्या नंतर फक्त एकटया बारामतीचाच विकास आणि पुन्हा जगातील मॉडेल बारामती म्हणून देशभर मिरवत राहणे हे राज्याच्या नेतृत्वाला शोभत नाही. स्व.यशवंतराव चव्हाण साहेब,स्व.वसंतदादा  पाटील,स्व.शंकररावजी चव्हाण साहेब,वसंतरावजी नाईक या महान नेत्यांनी ज्या वेळी राज्याचे नेतृत्व केले त्या वेळेस संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेऊन सर्वसमावेशक असा विकास केला. पण पवार साहेबांचा  स्वभाव नेहमी सत्ता कुठूनही असली तरी मात्र विकास बारामती कडे अश्या पद्धतीने एकूण त्यांचा कारभार आहे.


5 Tmc पाण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींना अंधारात ठेऊन व अचानक पणे घेतलेला आहे . ज्या वेळी एकदा धरणातून 5 tmc पाणी दुसऱ्या जिल्ह्यात वळवायचे आहे त्या वेळी लोक प्रतिनिधी व सरकारचा समन्यव पाहिजे होता. मुळात हे एक धरण जर सोडलं तर सोलापूर जिल्ह्याला सिंचनासाठी  दुसऱ्या कोणत्याही धरणावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे उजनी हे जिल्हाची वरदायिनी आहे,त्याच बरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तो प्राण आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अचानक पणे 5 tmc पाणी इंदापूरला वळवणे आणि अर्थमंत्री यांनी तातडीने त्याला 600 कोटी मंजूर करणे हे सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे. हा आघाडी सरकार चा गैरफायदा  घेण्याचा हा प्रयत्न आहे. भरणे मामा आमचे पालककमंत्री आहेत त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे,त्यामुळे एका बाजूला ते पालक असतांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच नरड दाबन ही भूमिका अतिशय गैर आणि अव्यस्त अशी आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने  शासनाने पाठीमागे घ्यावा तो पाठीमागे घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या कडे शिवसेनेचा आमदार या नात्याने  सर्व शक्ती पणाला लावून मी प्रयत्न करणार असून याची कायदेशीरही आम्ही लढाई लढू आणि वेळ पडली तर रक्तरंजित आंदोलनाला जिल्हा तयार होईल आणि त्याची जबाबदारी शासनावर राहील पण काहीही झाले तरी आम्ही हे पाणी जाऊ देणार नाही. असा जळजळीत इशारा शिवसेनेचे आ.शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे.त्यामुळे पूढील काही दिवसात नक्कीच 5 tmc पाण्यावरून मोठा संघर्ष उभा राहणार असून याची सुरुवात  जिल्ह्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील आमदारच करणार असल्याचे चित्र तरी सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget