आ. मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब व पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील साहेब यांनी दिल्या तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्र व २ ग्रामीण रुग्णालयाला भेटी
माजी आमदार मा राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील यांच्या मागणीनुसार मोहोळ तालुक्यातील अनगर येथे १०, नरखेड ५,शिरापुर ५,पाट्कुल 5,अंकोली५ ,बेगमपुर ५,कुरुल ५,कामती १० अश्या ८ प्राथमिक आरोग्य केंद्र व मोहोळ 25 व शेटफळ ग्रामीण रुग्णालयास १० असे २ ग्रामीण रुग्णालयास एकूण ८५ ऑक्सिजन बेडची प्रणाली कोरोना बाधित रुग्णाच्या उपचारांसाठी आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या पुढाकारातुन व स्थानिक निधीतून लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
यासंदर्भात सोमवार(दि १७)रोजी आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब,पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील साहेब यांनी तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्र व २ ग्रामीण रुग्णालयास भेट देवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला व लवकरच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन बेड ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पदाधिकारी व आरोग्य अधिकारी डॉक्टर उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.