मराठा आरक्षण रद्द केल्याप्रकरणी भाजपचे मंगळवेढा येथे ठिय्या आंदोलन




सोलापूर // प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात काल मराठा आरक्षण बाबत सुनावणी झाली दरम्यान काल सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे आज मंगळवेढा येथे भारतीय जनता पक्षा तर्फे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला .

बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर काल सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द म्हणून निर्णय दिला . या निर्णयामुळे मराठा समाजाची भावना दुखावली गेली आहे याबाबत भारतीय जनता पक्षाने निषेध नोंदवला असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार समाजाला न्याय देण्यास कमी पडल्याचे मत भाजपनेे व्यक्त केले आहे राज्य सरकारला मराठा समाजाची सद्यस्थिती माहीत असून देखील सरकारी वकिलांना समाजाची बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडता अली नसल्याचे भाजप कडून म्हणले जात आहे . राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे फक्त वसुली सरकार असून त्यांना मराठा समाजाशी कोणतेच देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहेत . आधी मराठा समाजासाठी काढलेली सारथी नावाची संस्था देखील बंद करण्याचे काम सरकारने केले नंतर आंदोलन केले पण संस्था चालू करून निधी कमी करण्याचे काम सरकारने केलेे असे मत भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावेळी मांडण्यात आले .

राज्यात मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले होते परंतु महाविकास आघाडी सरकारने त्यावर पाणी टाकण्याचे काम केले असे आरोप भाजपतर्फे केले आहेत .

दरम्यान भारतीय जनता पार्टीच्यावतीने मंगळवेढा शहरातील दामाजी चौक येथे ठिय्या मांडून निषेध आंदोलन करण्यात आले , यावेळी ठाकरे सरकार निष्क्रिय सरकार , राज्य सरकारचा निषेध असो, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन राज्य शासनाचा निषेध करण्यात आला . तसेच सरकारने लवकरात लवकर तत्काळ अधिवेशन बोलवून समिती स्थापन करून समाजाला न्याय देण्याचा काम राज्य सरकारने करावे असे निवेदन पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना देण्यात आले आहे .

या आंदोलनात भाजपचे विधानपरिषद आमदार मा . प्रशांत परिचारक , विधानसभा आमदार मा. समाधान आवताडे , जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर , तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल , शहराध्यक्ष गोपाळ भगरे , बाजार समिती सभावती सोमनाथ आवताडे ,येताळा भगत , राजेंद्र सुरवसे , नागेश डोंगरे , सुदर्शन यादव ,युवा मोर्चा अध्यक्ष सुशांत हजारे , ज्ञानेश्वर कोंडुभैरी , उमेश विभूते आदी उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget