विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आ. अमोल दादा मिटकरी यांनी रुग्णवाहिका जाहीर केली

 



(भावपूर्ण श्रद्धांजली च्या कार्यक्रमात वारकऱ्यांना झाले अश्रू अनावर आणि आमदार अमोल दादा मिटकरी यांचे डोळे पान्हावले)


महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक व प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्री विठ्ठल महाराज साबळे व त्यांच्या सौभाग्यवती गोकुळाबाई साबळे यांचे नुकतेच निधन झाल्याने वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि महाराजांचा फार मोठा भक्त परिवार आहे. महाराजांच्या मित्रमंडळी च्या माध्यमातून योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका येथे श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीधर महाराज अवारे अध्यक्षस्थानी असून महाराजांनी आपल्या जीवनातील साबळे महाराजांच्या संगतीत आलेले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार अमोल दादा मिटकरी हे उपस्थित असून आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात बोलताना सांगत होते विठ्ठल महाराज साबळे हे आम्हाला वडील स्थानी होते आज आमचा खूप मोठा आधार गेलेला आहे पण महाराजांचा मुलगा ऋषी साबळे यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही व आता ऋषी साबळे सरकारी दवाखान्यातून प्रायव्हेट दवाखान्यामध्ये भरती केलेला आहे व त्याच्या  प्रायव्हेट दवाखान्यातील सर्व खर्च मी करणार एवढेच नाही तर साबळे महाराज प्रत्येकांच्या स्मरणात राहायला पाहिजे याकरिता मी माझ्या निधीमधून स्वर्गीय विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किमान पंधरा लाखापर्यंत वारकरी रुग्णवाहिका देण्याचे आमदार अमोल दादा मिटकरी यांनी जाहीर केले. आमदार अमोल दादा मिटकरी श्रद्धांजलीपर भाषण देत असताना गहिवरून आले व त्यांना अश्रू अनावर झाले. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांनी साबळे महाराज यांच्या कुटुंबाला 21 हजार रुपयांची मदत जाहीर केली त्यानंतर सुभाष महाराज काळे यांनी महाराजांच्या संगतीत आलेले अनुभव श्रद्धांजलीपर भाषणामध्ये सांगितले याप्रसंगी अरुण महाराज बुरघाटे, श्रीधर महाराज पातोंड ,कोंडीराम महाराज नागरगोजे ,एकनाथ महाराज पवार ,चंद्रशेखर महाराज दाभाडे ,सोपान महाराज काळुसे, गजानन महाराज ऐरोकार, सोपान महाराज शेलार ,प्रकाश म पांडे यांचे श्रद्धांजलीपर भाषण झाले तेव्हा सर्वांचे अश्रू अनावर झाले याप्रसंगी काशिनाथ महाराज आंधळे, जनार्दन महाराज वाळके, निखील महाराज गोबरे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज अस्वार,गोपाल महाराज नारे ,दत्ता पाटील ओळंबे ,रमेश पाटील खीरकर ,श्रीधर महाराज तळोकार, संतोष महाराज घुगे ,वैभव  नायसे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन रतन महाराज वसु व योगेश्वर संस्थान चे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शासनाच्या नियम व अटींचे पालन करून केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget