सौ शौमिका अमल महाडिक यांची गोकुळ च्या संचालकपदी वर्णी!




कोल्हापूर // प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील तीन मंत्री, दोन खासदार आणि डझनभर आजी – माजी खासदार आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात गोकु पुन्हा सत्तारुढच बाजी मारणार की संघात सत्तांतर होणार याचा फैसलाआज होणाऱ्या मतमोजणीत होणार आहे. थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता गोकुळच्या मतमोजणीच्या दिशेने केंद्रित झाले आहे. गोकुळ वर सत्ता असणे म्हणजे कोल्हापूर जिल्हावार सत्ता असण्यासारखे असल्याने गोकुळच्या निवडीला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे.



पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या रणांगणात आघाडी घेतली आहे. महाडिक-पी.एन.पाटील गटाने आता गोकुळ च्या निवडणुकीत खाते उघडले आहे. महाडिक गटात ४ जागांच्या पराभवानंतर महाडिक गटाच्या माजी जिल्हापरिषद अध्यक्ष शौमिका महाडिक या अल्प मताने निवडून आलेल्या आहे. ४६ मतांनी शौमिका महाडिक यांचा विजय झाला आहे. शौमिका महाडिक यांचा निसटता विजय झालेला आहेत आणि त्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सुनबाई आहेत.


पहिल्या ३ आरक्षित जागांच्या निकालानंतर माजी आमदार सूचित मिणचेकर यांनी ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे म्हटले आहे.येणाऱ्या खुला वर्गातील १६ जागांसाठी देखील अशीच परिस्थिती असणार आहे असे मिणचेकर यांनी म्हटले आहे . पालकमंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने आतापर्यंत ४ आरक्षित जागांवर विजय मिळवला आहे तर माजी आमदार महाडिक गटाने एका जागेवर विजय मिळवलेला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत गोकुळ चे सर्व निकाल हाती येतील आणि कोणाची सत्ता गोकुळ वर येणार हे स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget