सोलापूर // प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्यामध्ये कोरोना टेस्टींग (रॅपीट टेस्ट) मुळे विविध समस्या व शंका निर्माण होऊन कोरोना महामारी विरोधात करीत असलेल्या कामकाजात अडथळा निर्माण होत आहेत . म्हणून कोविड टेस्टींग (रॅपीट टेस्ट) तात्पुरते थांबवून लसीकरणांवर जास्त भर द्यावे . असे विनंतीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी मा. मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे साहेब यांना मेलद्वारे पाठविल्याचे माहिती कामगार सेनेचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .
वरील संदर्भ मा. मुख्यमंत्री यांना कामगार सेनेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या निवेदनात मार्च २०२० पासून कोरोना महामारी संपुर्ण भारत देशासह महाराष्ट्रातही तांडव घातलेला आहे. सदर कोरोना महामारी रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने आपण अत्यंत शांततेने व सय्यमाने केलेला प्रयत्न हे वाकाणण्या जोगे आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या टप्यात केंद्र शासनाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन आपल्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्तम व संपुर्ण हिंदुस्थानातील चांगले काम केलेले एकमेव राज्य म्हणून महाराष्ट्राची व आपले गौरव करण्यात आले. हे संपुर्ण महाराष्ट्राला भूषणावह आहे.
कोरोना महामारीचा दुसरा टप्पा गेल्या वर्षाप्रमाणे मार्च महिन्यातच म्हणजे मार्च २०२१ ला सुरू झाले. या दुसऱ्या टप्ण्यात केंद्र शासनाने कोविड महामारी संपुर्ण जबाबदारी त्या - त्या राज्यांना दिले . परंतु इतर राज्यात तेथे सत्तेवर असलेल्या सत्ताधारन्यांनी दुसऱ्या टप्प्याच्या कोरोनाला गांभिर्याने पाहिले नाही . म्हणून त्याचे गंभीर परिणाम सध्या तेथील जनतेला भोगावे लागत आहेत . अशा परिस्थितीत मात्र आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने वेळो - वेळी चॅनलच्या माध्यमातुन जनतेला धीर , जबाबदारी आणि कर्तत्व हे जाणिव करुन देत असतांना माझे कुटुंब माझी जबाबदारी हा महामंत्र दिला आहे . त्याच बरोबर कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन या महामंत्राद्वारे प्रशासन , लोकप्रतिनिधी , सामाजिक संघटना , राजकीय पक्ष व तमाम महाराष्ट्रातील जनतेला विश्वासात घेऊन आणि काही नियमाबरोबर कडक लॉकडाऊनद्वारे कोरोना महामारी रोखण्याचे यशस्वी प्रयत्न करीत आहात . याबद्दल आपले त्रिवार जय महाराष्ट्र !
कोरोना महामारी आल्यापासून एकूण परिस्थितीचा विचार करता ज्या - ज्या लोकांना कोरोना लागण झालेली आहे . त्या सर्वांना आत्मविश्वास वाढविणे व रोग प्रतिकार शक्ती वाढविणे हेच महत्वाचे उपाय असल्याचे निर्दनास आले आहे . कोरोना बाधीत झालेल्या रुग्णाला उपचारासाठी दाखल केलेल्या रूग्णालयात अत्यंत चांगल्या पध्दतीने उपचार सुरु असतांना अनेक कुटुंबिय आमच्या रूग्णांना उपचार बरोबर होत नाही . दुर्लक्ष केले जाते , स्वच्छताचे अभाव , जेवण बरोबर मिळत नाही . अशा अनेक कारणांने लोकांमध्ये एक प्रकारचे भिती व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे . अशा परिस्थितीत एखादे रुग्णांचे कोरोनाने निधन झाल्यास कोणाही नातेवाईकाला जवळ न येऊ दिल्याने या संशयास दुजोरा मिळत आहे . आणि याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे अफवेच्या पार मोठ्या प्रमाणात कोरोना साखळी तोडण्यामागे अडथळा निर्माण होत आहेत . आणि प्रत्येक वेळी कायदा व सुस्ववस्था आणि वाद मिटविण्यासाठी पोलिस खाता व प्रशासनावर तणाव निर्माण होत आहे . याचपैकी एक अडचण असलेली बाब म्हणजे कोरोना टेस्ट (रॅपीट टेस्ट ) करण्याचे प्रमाण वाढल्याने एक प्रकारचे भितीचे वातावरण संपुर्ण राज्यात पसलेली आहे . कारण एखादा कुटुंबियातील व्यक्ती कोरोना टेस्टींग केल्यानतंर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर संपुर्ण कुटुंबच घाबरून जात आहे . यातूनच विविध समस्या निर्माण होतात . ते म्हणजे पतीला कोरोना झाला तर पत्नी , आईला कोरोना झाला तर मुलगा , मुलगाला कोरोना झाला तर आई , पत्नीला कोरोना झाला तर पती आणि इतर नातेवाईक अशांचे आत्महत्या वाढलेले आहेत . यात पोलिस कुटुंब , शासकीय कर्मचारी कुटुंब , शेतकरी कुटुंब , कामगार कुटुंब असे सर्वांचेच समावेश आहे . म्हणजे ज्या कोरोना महामारीचे साखळी तोडण्यसाटी कोविड टेस्ट (रॅपीट टेस्ट) करतो त्याच रॅपीट टेस्टमुळे आत्महत्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे . त्याच बरोबर संपूर्ण राज्यात एक भितीचे वातावरण तयार झालेले आहे .
कोरोना महामारी रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे जर भितीचे वातावरण निर्माण होत असेल तर कुठलेही प्रयत्न करून देखील त्याचा कुठलाही उपयोग होणार नाही . म्हणून कोरोना महामारी साखळी तोडण्यासाठी किंवा संपविण्यासाठी कोरोना टेस्ट (रॅपीट टेस्ट) व्यतिरिक्त इतर अनेक उपाय करावे . आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे कोरोना मुक्त लस वाढवून लोकांना भयमुक्त करावे . ही नम्र विनंती .
तरी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी वरील निवेदनाचा गांभिर्याने , सहानुभुतीने आणि आंतरआत्माने विचार करुन तात्पुरते स्वरुपात कोविड टेस्ट (रॅपीट टेस्ट) थांबवावे . आणि प्रतिबंदक लस देण्याचे प्रमाण वाढवावे. ही नम्र विनंत. अशा विविध विषयांबाबत माहिती दिली आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.