जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी केला प्रभाकर भैय्या देशमुख यांना फोन.




सोलापूर येथिल बैठक रद्द. सदरची बैठक पूणे येथे लावली असल्याबाबत केली चर्चा


सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर उजनी धरणातील पाच टीएमसी पाणीप्रश्नाबल सोलापूर जिल्हधिकारी मीलिंद शंभरकर यांनी जनहीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचेशी फोनवरून सविस्तर चर्चा झाली यामधे 7 तारखेची बैठक रद्द होऊन सरची बैठक 10 तारखेला पुणे येथिल सिंचन भवन येथे होणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी यांनी दिली. 

त्यावेळी बोलताना देशमुख यांनी शेतकरी हिताच्या व शेतकर्यांच्या जिवनमरणाचा प्रश्न असल्यामुळे  बर्याचशा गोष्टी कमी वेळेत निदर्शनास आणूण देण्याचा प्रयत्न केला.

 

सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी पळविले याच्या निषेधार्थ व तो निर्णय रद्द व्हावा यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया प्रहार संघटनेचे दत्ताभाऊ व्यवहारे रयत संघटनेचे अण्णा जाधव अमोल गायकवाड बळीराजाचे माऊली जवळेकर मंगळवेढा 35 गाव पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष बापूसाहेब मेटकरी धनाजी गडदे यांनी आपल्या जिवाचा विचार न करता उजनी जलाशयातच उड्या टाकून आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत जिल्हाधिकारी किंवा पालक मंत्री येऊन निर्णय रद्द झाल्याचे सांगत नाहीत तोपर्यंत पाण्याबाहेर येणार नाही अशी आक्रमक भूमिका देशमुख यांनी घेतल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी यांनी 07 तारखेला सोलापूर येथे पालकमंत्री यांचेसोबत चर्चा असलेची माहीती दिली होती त्यामुळे सदरचे आंदोलन तुर्तास स्थगीत करण्यात आले होते.त्या मुळे पुढील बैठकीची माहीती देण्यासाठी देशमुखांशी चर्चा केली.

     

त्याचबरोबर मंगळवेढा पस्तीसगाव पाणीप्रश्ना बाबत, बार्शी उपसा सिंचन योजना, तसेच मोहोळ तालुक्यातील सीना भोगावती जोड कालव्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचेही देशमुखांनी जिल्हाधिकारी यांना सांगीतले व सोलापूरला हक्काचे 117 टीएमसी मिळालेले पाणी सुध्दा कमीपडत आहे. तरी आम्ही एक टीएमसी देखिल पाणी इंदापूरला जाऊ देणार नाही कारण सोलापूरला मिळणार्या आठ पाळ्यातील दोन पाळ्या  कमी होतील असेही देशमुखांनी सांगीतले.

   

त्याचबरोबर उजनी धरणात सांडपाणी येत नाही, मगो पालकमंत्री हे  सांडपाणी कोठून आणणार आहेत हाच सवाल त्यांना मी बैठकीमधे विचारणार आहे असे प्रभाकर देशमुखांनी सांगीतले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget