विडी कारखाने चालू करण्यासाठी महापौरांनी हस्तक्षेप करावा.




सोलापूर // प्रतिनिधी 

कोरोना लॉकडाउनचे संकटकाळात शहरातील विडी कारखाने उघडण्यास अद्यापी परवानगी देण्यात आली नसल्याने ६० ते ७० हजार विडी कामगार मागील ४५ दिवसापासून आर्थिक दुरावस्थेत आहेत . वास्तविक कोरोना लॉकडाउनची यंत्रणा राबविताना प्रशासन "वर्क फ्रॉम होम" ही संकल्पना मान्य करते . विडी कामगार सुध्दा विडी वळण्याचे काम आपापल्या घरात बसून करतात . म्हणून "वर्क फ्रॉम होम" नुसार विडी कारखाने सुचना करण्याचे निर्देश देण्याबाबत आपण सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री . पी . शिवशंकर यांना द्यावेत अशी मागणी महापौर सौ . श्रीकांचना यन्नम यांना सोलापूर विडी कामगारांचे वरीष्ठ मंडळांनी निवेदनाद्वारे समक्ष भेटून केली आहे . या शिष्ठमंडळात महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) , महाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पल्ली , नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सायबण्णा तेग्गेळ्ळी , राष्ट्रीय विडी मजदूर संघ ( इंटक ) चे सचिव राहुल गुजर , सोलापूर शहर काँग्रेस विडी - यंत्रमाग कामगार सेलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण दासरी या पाच कामगार संघटनाचा समावेश होता.

विडी कारखाने बंद असल्याने हजारो विडी कामगार हक्काची रोजगारी गमावून बसले आहेत . त्यांना उपाशीपोटी राहावे लागत आहे . दररोज आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागत आहे . म्हणून तातडीने विडी कारखाने चालू करावेत यासाठी आपण शासन , मा . जिल्हाधिकारी , म.न.पा.मा. आयुक्त , यांचेकडे तातडीने शिफारस करावी . अशी मागणी माहापौर सौ. श्रीकांचना यन्नम यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

 मा . मुख्यमंत्री श्री . उध्दवजी ठाकरे , मा . उपमुख्यमंत्री श्री . अजित पवार , मा . कामगारमंत्री श्री . हसन मुश्रीफ , मा . कामगार राज्यमंत्री श्री . बच्चु कडू , मा . पालकमंत्री श्री . दत्ता ( मामा ) भरणे यांना यापुर्वीच ई मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे .

            

विडी कामगार संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर , सो.म.न.पा. समोर , विडी मालक संघाचे कार्यालयासमोर यापूर्वी धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले आहे . मागण्या मान्य होईपर्यंत दररोज एका कार्यालयासमोर यापुढेही आंदोलन सुरूच राहणार आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget