ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू!




कोरोना विषाणू आपल्यातून बरेच आप्तस्वकीय घेऊन जात आहे. अनेक सामान्य लोक यात विविध कारणांनी होरपळून निघत असताना, ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या एका संशोधकाने आपले प्राण ऑक्सिजनअभावी गमावले आहेत.

कोल्हापूर येथील प्रा. डॉ.भालचंद्र काकडे यांचे निधन ऑक्सिजन न मिळाल्याने झाले आहे. ते चेन्नई येथे एका सरकारी दवाखान्यात कोरोना झाल्याने दाखल झाले होते. 4 दिवस घरीच सौम्य लक्षणं असल्याने ते विलगिकरणात उपचार घेत होते. 

 एक दिवस तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. ते व्हेंटिलेटर वर होते मात्र, उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मंगळवारी अचानक त्या दवाखान्यातील ऑक्सिजन पुरवठा संपला आणि 10 जण गतप्राण झाले, त्यात डॉ. काकडे एक होते. 

*काय संशोधन करत होते डॉ. काकडे?*

रसायनशास्त्रातली उच्चपदवी घेऊन जगभरातील अनेक देशांनी दिलेली ऑफर नाकारून त्यांनी भारतातच संशोधन करण्याचा निर्णय घेतला. सध्या ते चेन्नई येथील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेत प्राध्यापक व संशोधक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत संशोधक म्हणून काम करत होत्या.

डॉ. काकडे यांनी शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्राची पदवी घेऊन फेलोशीप मिळवून पुण्यातील रासायनिक प्रयोगशाळा, जपानमधील टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंधननिर्मितीबाबत संशोधन केले. 

त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेने रेल्वे धावू शकेल, याचा ध्यास घेतला. 20 वर्षे त्यांनी या संशोधनात व्यतित केली. ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले आणि जाताजाताच इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर 7 पेटंटही मिळवले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget