लोकप्रतिनिधी कसा असावा हे शब्दातुन व्यक्त केले आहे. पुळुज(ता.इंदापूर)येथील सरपंच शिवाजी शेंडगे



    

लोकनेता कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, नव्हे नव्हे तर माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा माणसांच्या मनावर सत्ता गाजवणारा एक लोकप्रिय एक लोकसेवक मा.आमदार यशवंत (तात्या )माने यांच्याबरोबरचा आजचा किस्सा मी तुमच्याबरोबर शेअर करतोय मित्रांनो खरंतर तात्यांनी आज अनगर येथे जाऊन कोरोनाची लस घेतली होती .लस घेतली म्हणल्यावर विश्रांती घेणे तितकेच महत्वाचे  आहे. पण तरीसुद्धा कुठलीही विश्रांती न घेता कोव्हीड सेंटरला भेटी देऊन न थांबता काम सुरुच होते. आम्ही गेल्यावर जेवणाचा टाइमिंग झाले होते पण शहीद धनाजी व्होनमाने  स्मारकाचा विषय घेऊन गेले म्हणल्यावर आपले जेवण बाजूला सारून अगोदर तुमचा विषय संपवतो सरपंच म्हणून काम हातात घेतले. आणि काम संपवून टाकले .खरतर तात्यांची कामे कोटी रुपये चालू आहेत. न थांबता न थकता मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांनी जो विश्वास टाकला आहे त्याला पात्र आहोत. मोहोळ तालुक्यात काम करत असताना आमदार साहेबांनी शंभर टक्के वेळ दिलेला आहे .खरंच हा माणूस कामाचा आहे .राजकारण हा विषय  बाजूला सोडून द्या .(एखाद्या गावचा सरपंच जरी असला एकदा लस घेतली तर तो घराच्या बाहेर सुद्धा येत नाही.) आणि तात्या लस घेऊन सुद्धा काम सुरूच आहे .बाकी काही नाही या माणसाचे पाय नेहमी जमिनीवर असतात.

तात्यांना इथल्या सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यात आनंद वाटतोय. तात्या तुम्हाला एकच सांगतोय आमच्या मतदारसंघात तुम्ही आहे ,या गोष्टीचा अभिमान आहे. पुढील वेळेस तुम्हाला या भागात  मत मागायला येण्याची वेळ येऊ देणार नाही एवढे आवर्जून नक्की सांगतो .तात्या तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्या पुळूज ग्रामपंचायत वतीने हार्दिक शुभेच्छा आपलाच लोकनियुक्त सरपंच शिवाजी शेंडगे

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget