सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने मोदी येथील कचरा वेचणाऱ्या भगिनींना काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल साहेब यांच्या हस्ते अन्नधान्य साहित्य किट वाटप, तसेच कामाठीपुरा येथेही अन्नधान्य साहित्य किटचे वाटप



तसेच लोधी गल्ली व लष्कर भाजी मंडई परिसरात 1000 नागरिकांना मास्क वाटप


सोलापूर // प्रतिनिधी 

मोदी भागात बहुसंख्य असंघटीत व कचरा वाचणारे कामगार वर्ग आहेत त्यांचे हातावरचे पोट असून काम केल्याशिवाय त्यांचे घर चालत नाही कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांचे काम बंद रोजी रोटी चे हाल होत आहेत त्यामुळे गोगरिबांची सेवेची संधी म्हणून कचरा वेचणाऱ्या भगिनींना सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने माजी आमदार प्रकाश यलगुलवार, व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार माजी नगरसेविका आशाताई म्हेत्रे व ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे यांच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या हस्ते अन्नधान्य साहित्य किट चे वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विशाल चौधरी, आदित्य भोसले, राहुल मनसावाले यांच्या माध्यमातून कामाठीपुरा भागातील गरजु कुटुंबाना अन्नधान्य साहित्य किट वाटप करण्यात आले.

कॉंग्रेस शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय मैनावाले व लखन गायकवाड यांच्या माध्यमातून कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वताचा बचाव करावा म्हणून लोधी गल्ली व लष्कर भाजी मंडई परिसरात 1000 नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी गोरगरिबांच्या सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी नागरिक बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget