माढा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी रु. 56 कोटींचा निधी मंजूर.




ग्रामीण भागातील 60 कि.मी. रस्ते डांबरीकरण करून पक्के होणार आ. बबनदादा शिंदे यांची माहिती


सोलापूर // प्रतिनिधी 

माढा तालुक्यासह माढा विधानसभा मतदारसंघातील भाग हा संपूर्ण ग्रामीण क्षेत्रातील असून या भागामधील रस्ते पक्के करण्यासाठी विविध योजनांमधून निधी मिळविणेसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून माढा तालुका व माढा मतदारसंघातील समाविष्ठ असलेल्या पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून केंद्र व राज्यशासन यांच्या  निधीतून सुमारे रु. 56 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून यामधून 60 कि.मी. रस्त्यांचे डांबरीकरण करून रस्ते पक्के होणार असून लवकरच रस्ते दुरूस्तीचे कामास सुरूवात होणार असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.


याबाबत अधिक माहिती अशी की रस्त्यावरून वाहतुक करताना स्थानिक नागरीक, शालेय विद्यार्थी, रुग्णांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे स्थानिक नागरीकांनी रस्ता दुरूस्तीची मागणी केलेली होती. आ.बबनराव शिंदे व आ.संजयमामा शिंदे यांनी शासनाकडे सदर रस्ता दुरुस्तीसाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे ही रस्त्याची कामे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेली  आहेत. यामध्ये केंद्रशासन 34 कोटी व राज्यशासन 22 कोटी असे एकुण 56 कोटी रूपयांचा निधी या कामांसाठी मिळणार आहे. या रस्त्यांच्या कामास प्रत्यक्ष लवकरच सुरूवात होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.


यामध्ये माढा मतदारसंघातील 1) माढा ते विठ्ठलवाडी रस्ता -  6 कि.मी  रु. 5 कोटी 85 लाख  (2) मोडनिंब-तुळशी-हनुमंतवाडी-वरवडे रस्ता 10 कि.मी. रु. 9 कोटी 24 लाख (3) लऊळ ते शिराळ (मा) रस्ता 5 कि.मी रु. 4 कोटी 50 लाख (4) चोभेपिंपरी ते रोपळे (क) रस्ता 7.50 किमी. रु. 7 कोटी 15 लाख एकुण  रु. 27 कोटी इतका निधी माढा तालुक्यासाठी तसेच (1) करकंब-भोसे-व्होळे रस्ता 11 कि.मी रु.7 कोटी 80 लाख (2) करकंब ते घोटी रस्ता 4.20 किमी रु.3 कोटी एकुण रु. 11 कोटी इतका निधी पंढरपूर तालुका तसेच (1) माळखांबी ते जांभुड रस्ता 3.30 किमी. रु.2 कोटी 73 लाख (2) वेळापूर ते महाळुंग रस्ता 7.50 किमी. रु.6 कोटी 30 लाख (3) श्रीपूर चौकी ते खंडाळी रस्ता 3.50 किमी रु.2 कोटी 73 लाख (4) श्रीपूर डी 19 ते माळेवाडी (बोरगाव)वेळापूर रस्ता 7 किमी रु.5 कोटी 35 लाख एकुण रु.17 कोटी 10 लाख इतका निधी माळशिरस तालुका असा माढा मतदारसंघासाठी एकुण 60 कि.मी रस्ता मंजूर झालेला असून रु.56 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे असे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget