सोलापूर शहरातील बे कायदेशीर विडीचे (बुट्टी) कारखाने बंद करा:- कामगार सेनेची मागणी




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात विडी कामगार असून सध्या लॉकडाऊन मुळे विडी कारखाने बंद असल्याने महिला विडी कामगार बेकार झाले आहेत . या मजबुरीचा फायदा घेऊन बे कायदेशीर बुट्टी कारखानदार अत्यंत तुटपुंजी मजुरी देऊन विडी बनवून घेत आहेत. अशी कारखाने त्वरीत बंद करावे . अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मा . जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे . 

कोरोना प्रादुर्भावाचा दुसऱ्या टप्प्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांनी १ एप्रिल २०२२ पासून लॉक डाऊन पुकारले आहे . त्यामुळे विडी कारखाने पुर्णपणे बंद आहेत. या बंद काळात महिला विडी कामगारांना काम नसल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर उपासमारीचे वेळ आली आहे . याचाच फायदा घेवून वे कायदेशीर विडीचे (बुट्टी कारखानदार) तुटपुंजी मजुरी देऊन महिला विडी कामगारांचे पिळवणुक करीत आहे . आणि त्याच बरोबर कोरोना विरूध्दचे नियम भंग करुन कोरोना संक्रमण वाढविण्यास मदत करीत आहेत . म्हणून सोलापूर शहरातील वे कायदेशीर विडीचे ( बुट्टी ) कारखाने त्वरीत बंद करावे . असे निवेदनात नमुद करण्यात आली.

सदर निवेदनाचे प्रत मा. मुख्यमंत्री , मा. उपमुख्यमंत्री , मा. कामगार मंत्री , मा. कामगार राज्यमंत्री, मा. आरोग्यमंत्री , आरोग्यमंत्री , मा. पालकमंत्री , मा. जिल्हाधिकारी , मा. पोलिस आयुक्त , मा. म.न.पा. आयुक्त यांना पाठविण्यात आली आहे .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget