सोलापूर // प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, कॉम्पुटर तंत्रज्ञानचे प्रणेते, युवकांना मतदानाचा अधिकार देणारे स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 1 येथील बिगारी काम करणाऱ्या, विनायक नगर राम मंदिर जवळ येथे विडी कामगार महिलांना, तसेच सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 येथील मांग गारुडी समाजातील गरजु कुटुंबाना माजी आमदार प्रकाश यलगुलवार, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या तर्फे सोलापूर शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष अनिल मस्के, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष युवराज जाधव व युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष नरेश येलूर यांच्या माध्यमातून गरजु कुटुंबांना अन्नधान्य साहित्य किट चे वाटप काँग्रेसचे जेष्ठ नेते किसन मेकाले गुरुजी, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, टकारी समाज अध्यक्ष नारायण जाधव, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, परिवहन सदस्य गणेश साळुंखे, ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मीकांत साका, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, भारत गायकवाड, विवेक जाधव, लक्ष्मण गायकवाड, प्रवीण गायकवाड, राम वाकसे, रवी शिंगाडे, श्रीकांत सकट, चंद्रकांत लोंढे, मनोहर माचरला, सतीश संगा, श्रीनिवास पोटाबत्ती, रामलिंग येलूर, दुर्गादास मामद्याल, शंकर कणकी, महेश येलूर, युवराज गोरंटला, प्रशांत कोंडा, नरेश कैरमकोंडा, राकेश मंथेन, नितीन सकिनाल, नामदेव कुणी आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.