ना.जयंत पाटील यांच्या पुतळा जाळून शासनाचा निषेध. प्रभाकर भैय्या देशमुख सह आठ आंदोलकांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 



सोलापूर // प्रतिनिधी

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केला.मात्र शासन आदेश न आल्याने चिडलेल्या आंदोलकांनी ना.जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून शासनाचा निषेध केल्याप्रकरणी ९ आंदोलकांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रभाकर देशमुख रा.मोहोळ,सचिन जगताप रा.सापटणे,दत्तात्रय व्यवहारे रा.पंढरपूर, विठ्ठल मस्के रा.शेवरे,दत्तात्रय जाधव, नितीन जाधव,कुमार गोडसे तिघे रा. फुलचिंचोली,विजय मोरे रा.बावी,गणेश शिंदे रा.रोपळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा शासनाने निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यात असंतोष निर्माण झाला आहे. तसेच शासनाने हा निर्णय तातडीने रद्द करावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख उर्फ भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणाच्या गेट समोर गेल्या १३ दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनात गुन्हा दाखल झालेले वरील सर्व कार्यकर्ते सहभागी आहेत.

सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास जयंत पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून आंदोलकांनी शासनाच्या विरोधात मोठमोठ्याने घोषणाबाजी केली.शासनाचा निषेध केला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे करायचे काय,खाली मुंडी वर पाय याप्रमाणे शासन विरोधात व मंत्रीमहोदयांच्या विरोधात तुफान घोषणाबाजी केली. याबद्दल पोना.बाळासाहेब बबन चौधरी नेमणूक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांच्यावरती गु र नं ३३३/2021 भादवि कलम, 143,147,149,188,269,270, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, साथरोग अधिनियम कायदा 1897 चे कलम 3,4, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक शिंदे हे  करीत आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget