कोरोना प्रादुर्भावामुळे कामगारांचे काम बंद असल्यामुळे घर चालविणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गोगरिबांची सेवेची संधी म्हणून सोलापूर शहर कॉंग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने माजी आमदार प्रकाश यलगुलवार, व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार माजी नगरसेवक जेम्स जंगम यांच्या माध्यमातून जेम्स जंगम यांचा संपर्क कार्यालय जवळ जाम्बमुनी नगर लष्कर सोलापूर येथे कचरा वेचणाऱ्या निराधार भगिनींना व बांधकाम काम करणाऱ्या भगिनींना अन्नधान्य साहित्य किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी सोलापूर महानगर पालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, नरसिंग मिसालोलु, डेव्हिड जंगम, भारत तल्लारे, पांडुरंग म्हेत्रे, व्यंकटेश गुंडे, चेतन जंगम, तिमोथी आसादे, उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.