मोहोळ मतदारसंघातील रस्तासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३८ कोटी हुन अधिकचा निधी मंजूर आ. यशवंत (तात्या) माने यांची माहिती



             

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार साहेब,जलसंपदा मंत्री मा ना जयंतजी पाटील साहेब व ग्रामविकास मंत्री मा ना हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या विशेष सहकार्यतुन व माजी आमदार मा राजनजी पाटील साहेब व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष मा बळीराम(काका)साठे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मोहोळ उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यातील गावातील रस्तासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३८ कोटी १८लाख ५१ हजार एवढा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती आमदार मा यशवंत(तात्या)माने साहेब यांनी दिली आहे.

  

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मोहोळ तालुक्यातील  १)प्रजिमा १४३,अर्जुनसोंड ते सावळेश्वर रस्त्यासाठी २कोटी ८२ लाख ९१हजार,२)नरखेड ते अनगर रस्ता ८कोटी,८५लाख,४३ हजार ३)कुरुल,परमेश्वर पिंपरी,दादपुर चौक ते पिरटाकळी रस्ता ५कोटी,५७लाख ६ हजार ४)रामा १४१,खवणी,सारोळे ते चिखली ६ कोटी,७४ लाख ६९ हजार तर उत्तर सोलापूर तालुक्यातील १) बानेगांव,कारंबा,ते चिंचोळी MIDC 1कोटी,७८लाख,९१ हजार,२)गुळवंची,कोंडी,अकोलेकाटी  ते रामा २०४ रस्ता ३ कोटी ९२ लाख ९२ हजार,३) रामा ६५,कोंडी,कारंबा,मार्डी ते जिल्हा हद्द रस्ता ३ कोटी,९४ लाख ८ हजार तसेच पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी, सरकोली ते शंकरगाव रस्त्यासाठी ४कोटी,५१ लाख,७९ हजार एवढा निधी रस्ताच्या कामासाठी मंजूर केले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget