(प्रांताधिकारी सचिन ढोले यांची प्रमुख उपस्थिती)
सोलापूर // प्रतिनिधी
शहीद पोलिस उपनिरीक्षक धनाजी तानाजी होनमाने यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पंढरपूर तालुक्यातील पुळूज या त्यांच्या मूळ गावी आज त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,यावेळी प्रशासना
मधला कोहिनूर हिरा म्हणून ज्यांची ओळख आहे ,असे पंढरपूर विभागाचे प्रांत सचिनजी ढोले साहेब ,पंढरपूरचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा. रविकिरण घोडके साहेब ,पोलीस निरीक्षक आवचर साहेब, खरंतर होनमाने साहेब शहीद होऊन आज एक वर्ष झालं दिवस कसे गेले हे कोणालाच काही समजले नाही पण होनमाने साहेबाच्या कुटुंबासाठी प्रत्येक दिवस साहेबांच्या आठवणी शिवाय जात नाही. एकीकडे आपला मुलगा देशासाठी शहीद झाला या गोष्टीचा अभिमान तर दुसऱ्या बाजूला हातातोंडाशी आलेला घास देवाने हिरावून घेतला या गोष्टीचे दुःख. त्यांना या दुःखातून सावरण्यासाठीव धीर देण्यासाठी आज प्रांत साहेब,बी.डी.ओ.साहेब, पोलिस निरीक्षक साहेब , त्यांना धीर दिला व त्यांच्या कर्तुत्वान मुलाविषयी आम्हालाही अभिमान आहे. आमच्या खात्याला अभिमान आहे. या गोष्टींना मुळे साहेबांच्या आई-वडिलांचा ऊर भरून आला. सकाळपासूनच गावामध्ये साहेबांच्या आठवणी ची लगबग सुरू झाली होती अंगणवाडी ताईंनी व आशाताईंनी रांगोळी काढण्यास सुरुवात केली होती त्या रांगोळी मध्ये त्यांनी तिरंगा काढला होता त्या तिरंग्याला पाहून साहेबांची आठवण झाली की साहेबाला गुंडाळून त्याच तिरंगा मध्ये दिले होते. पुळूज मधल्या प्रत्येक ग्रामस्थांना आम्ही शहीद धनाजी होऊन होनमाने यांच्या गावचे आहे या गोष्टींचाअभिमान वाटतो. खरतर साहेबांविषयी किती जरी लिहिलं तरी शब्द कमीच पडतील साहेब तुम्हाला पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आपलाच लोकनियुक्त सरपंच पुळूज शिवाजी शेंडगे, आदी सर्व मान्यवर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.