(करमाळा प्रतिनिधी विजय निकत ):- कोर्टी ता करमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली असून "मरणापासून वाचण्यासाठी मरणाशीच संघर्ष करण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे". प्रशासनाने याबाबतीत गर्दी कमी करण्यासाठी योग्य ती करवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
कोरोना रोग भारतात येऊन वर्ष होऊन गेले... कोरोना हा श्रीमंताच रोग आहे ,गरीबाला काय होत नाही, अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची झाली होती, त्याला कारणही तसेच होते ते म्हणायचे आम्ही दररोज शेतात असतो, मजुरी करतो, त्यामुळे आम्ही कोणाच्या संपर्कात येत नाही, श्रीमंत लोक जिल्ह्यात, परदेशात, जातात अन् रोग घेऊन येतात. सुरुवातीला नुकतेच पेशंट भारतात कुठेतरी निघत असताना ग्रामीण भागात नागरिक बाहेर गेले तरी अंघोळ करुनच कपडे बाहेरच धुवायला टाकून, सॅनिटाइज करून घरात प्रवेश करायचे पण आता कोरोना उंबऱ्यात आला तरी एवढी काळजी घेताना कोण दिसत नाही, सध्या विविध ठिकाणी लसीकरण चालू असून सोशल डिस्टन्स ,व गर्दी करू नये,या आरोग्य विभागाच्या नियमांचा बोजवरा उडाला असल्याचे दिसत आहे ,यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे, लसीचा तुटवडा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार तसेच वशिलेबाजी यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून 'मोबाईल डायलटोंन' च्या माध्यमातून लसीकरण करण्याचे केलेले आवाहन, यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली व् नागरिक लस घेण्यास तयार झाले मात्र लसीच्या तुटवड्या मुळे लसीकरणाचा फज्जा उडाला आहे शासनाला पुरता लस पुरवठा करता येत नसेल तर विविध माध्यमातून लस घेण्याचे आवाहन, मोबाईल डायलटोंन बंद करा, आशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहेत, उपलब्ध लसीसाठी जवळचे नातेवाईक, पुढारी, यांचे कडून वशिलेबाजी लावून लस दिली जाते आणि सर्वसामान्य नागरिक तासन तास रांगा लाउन गर्दी करताना दिसत आहेत मग खेदाने ...लस नको पण...गर्दी आवर,! अन् ज्याचा वशिला त्यालाच 'टोकन' लशीला.असे म्हणण्याची वेळ आली आहे याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.