पंढरपूर शहरांमध्ये दोनच केंद्रावर नागरिकांना लस दिली जात आहे, या दोन्ही केंद्रावर पंढरपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व यामुळे गोंधळ उडाला होता , व या ठिकाणी वशेलिबाजी दंडेलशाही ही मोठ्या प्रमाणात झाली होती यामुळे लस वाटप करणारी सर्व यंत्रणा ढासळलेली होती, लस केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी पंढरपूर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध करून द्यावी जेणेकरून ज्याची ऐपत आहे ते पैसे भरून लस घेतील व ज्यांची ऐपत नाही असे गरीब लोक शहरातील शासनाच्या लस केंद्रावर जाऊन लस घेतील यामुळे लस केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन गोंधळ उडणार नाही व सरकारच्या तिजोरीवर पडणारा ताणही काही प्रमाणात कमी होईल तरी प्रशासनाने त्वरित शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध करून द्यावी व नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.