पंढरी नगरी ही साधू संतांची भूमि आहे येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी येणा-या भाविकभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असते सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट असून येथील छोट्या मोठ्या व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे पंढरपूर नगरपालिकेस गत वर्षी मिळालेल्या पाच कोटी यात्रा अनुदानातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्गाची काँक्रिटीकरण थांबवण्यासाठी निविदा अखिल भारतीय छावा संघटनेचे शहराध्यक्ष पंढरपूर सागर चव्हाण यांनी दिली आहे.
वास्तविक पाहता प्रदक्षिणामार्ग कॉंक्रिटीकरण करण्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत व या रस्त्यावर कॉक्रीटीकरण केल्याने रस्त्याची उंची वाढणार आहे, पावसाचे पाणी या रस्त्यावर साठून राहणार आहे, व रस्त्यावर घरे दुकाने खाली जाणार आहेत व यामुळे नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी जाणार आहे आणि पुन्हा रस्ता कुठल्या ना कुठल्या कारणांनी उकरला जाणार उदाहरणार्थ ड्रेनेज दुरूस्ती, नळ दुरुस्ती, वरून जिओ कांपनीची 5 जी लाईन येणार आहे, अश्या अनेक कारणाने हा रस्ता वारंवार उकरला आहे आणि जर हा रस्ता नागरिकांनी कुठल्या कारणाने उकरला तर त्याची भरपाई म्हणून नगर पालिका त्या नागरिकांनकडून 5 पट दंड आकारणार आणि पुन्हा तीथे खडीकरण देखील करता येणार नाही.
त्यामुळे नगरपालिकेने हे काम करण्याचा हट्ट बाजूला ठेवून गेल्या दीड वर्षात एकही वारी भरली नाही हातावरचे पोट असलेले येथील लोक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत हे लक्षात घेऊन निदान लोकांच्या राहत्या घराचा तरी मुन्सिपल कर पाणीपट्टी काही प्रमाणात माफ करावी व माणुसकी दाखवावी, पालिकेने ठेकेदार न सांभाळता शहरातील गोरगरीब नागरिक संभाळावेत ही नम्र विनंती

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.