सांगोला विधानसभा मतदार संघातील भाळवणी विभाग व जिल्हा परिषद गटातील तिसंगी ते आंबुले वस्ती रु.१० लाख, भाळवणी ते चव्हाण जाधव वस्ती, गार्डी रु.१० लाख, ऊपरी ते गादेगाव रु.९.५० लाख, जैन वाडी मिरजेवस्ती मार्गे गोफणे वस्ती रू.१४ लाख, धोंडेवाडी ते सुपली रू.१५ लाख, भंडीशेगाव ते शेळवे रु.३५ लाख असा एकूण रु.१ कोटीचा निधी जिल्हा नियोजन समिती मार्फत मंजूर झाल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ.शोभाताई तानाजी वाघमोडे-देशमुख यांनी दिली.
सदर निधी हा ग्रामीण रस्ते दुरुस्तीसाठी मंजूर झालेला असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होईल. सदरची कामे मंजूर करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. श्री.प्रशांतराव परिचारक साहेब व सांगोल्याचे आमदार अॅड.मा.श्री शहाजीबापू पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचेही यावेळी सौ.शोभाताई तानाजी वाघमोडे-देशमुख व जि.प.सदस्य सौ.सविता निखिलगिर गोसावी यांनी सांगितले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.