शहरातील ५ कामगार संघटनांची एकमुखी मागणी. विडी कारखाने त्वरीत चालू करा.


सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहरातील ६० ते ७० हजार विडी कामगारांना रोजगारी देणारे विडी कारखाने कोरोना लॉकडाउनमध्ये मागील ४५ दिवसांपासुन बंद असल्याने कामगारांचे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे . म्हणून विडी कारखाने त्वरीत चालू करा यासाठी सोलापूरातील महाराष्ट्र कामगार सेना, महाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघटना, राष्ट्रीय विडी मजदूर संघ (इंटक), नवमहाराष्ट्र कामगार संघटना, विडी यंत्रमाग सेल सोलापूर काँग्रेस कमिटी* असे ५ संघटना एकत्रित येऊन सोलापूर विडी कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी . शिवशंकर यांना समक्ष भेटून मागणी केली . संदीप लटके नायब तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी यांची निवेदन स्विकारले. 

कोरोना लॉकडाउन नियमावलीत प्रशासन एका बाजूने “वर्क फ्रॉम होम” संकल्पना मान्य करते आणि दुसरीकडे विडी कामगार महिला घरी बसून विडी वळण्याचे काम करीत असतांना विडी उद्योगाचे बाबतीत मात्र शासन दुजाभाव करीत आहे . ही बाब या ५ कामगार संघटनांनी सोलापूर म.न.पा. आयुक्त पी. शिवशंकर यांना चर्चेत लक्षात आणून दिले. 

              

सोलापूर शहरातील महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस:- विष्णु कारमपुरी (महाराज), महाराष्ट्र कामगार व कर्मचारी संघाचे अध्यक्ष :- अनिल पल्ली, नवमहाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष :- सायबण्णा तेग्गेळ्ळी, राष्ट्रीय विडी मजदूर संघ (इंटक) चे सचिव :- राहुल गुजर, सोलापूर शहर काँग्रेस विडी व यंत्रमाग सेलचे अध्यक्ष :- लक्ष्मीनारायण दासरी* असे ५ प्रमुख कामगार संघटना एकत्रित येऊन सोलापूर विडी कामगार संघटना कृती समितीचे माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विडी कारखाने त्वरीत चालू करा . या मागणीसाठी लक्षवेधी धरणे आंदोलन केले. 

विडी कारखाने त्वरीत चालू करावेत ही मागणी मान्य होई पर्यंत या ५ कामगार संघटनेची कृती संघटनेमार्फत शहरातील विविध भागात यापुढे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना मागण्याचे निवेदन देतांना या प्रमुख कामगार संघटना पदाधिकारी सह प्रसाद जगताप, दशरथ नंदाल, प्रशांत जक्का, विठ्ठल कु -हाडकर, संतोष जाधव, पप्पु शेख, गणेश म्हंता, श्रीनिवास बोगा, नागार्जुन कुसूरकर यांचेसह अनेक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. 

सदर नवेदनाचे प्रत मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. कामगार मंत्री, मा. कामगार राज्यमंत्री, मा. पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांना पाठविण्यात आले आहे.

 

सोलापूर विडी कामगार संघटना कृती समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी व म.न.पा. आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतांना विष्णु कारमपुरी (महाराज), अनिल पल्ली, सायबण्णा तेग्गेळ्ळी, राहुल गुजर, लक्ष्मीनारायण दासरी, आदि दिसतआहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget