सोलापूर // प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांना सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या वतीने सॅनिटाईजर व मास्क वाटप सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले यांच्या हस्ते तसेच सोमपा परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला यांच्या उपस्थितीत पार्क चौकातील सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात सॅनिटाईजर व मास्क वाटप करण्यात आले. तसेच सर्व पत्रकार बांधवांसाठी सॅनिटाईजर व मास्क सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पोच केले आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, अप्पासाहेब पाटील, संदीप वाडेकर, नितीन पात्रे यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले कि कोरोना महामारीच्या काळात पत्रकार बांधवानी आपल्या जीवाची पर्वा न करता सत्य परिस्थिती जनतेपुढे मांडून जनतेच्या मनातील भीती कमी करण्याचे काम, चुकीच्या गोष्टिवर प्रहार करण्याचे काम पत्रकार बांधवानी केले आहे. आणि करत आहेत. अश्या पत्रकार बांधवांसाठी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी सॅनिटाईजर व मास्क वाटप करण्याच्या स्तुत्य उपक्रम घेतला आहे. असे विचार व्यक्त केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.