सोलापूर // प्रतिनिधी
सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी वतीने कोरोना संशयित रुग्ण, व कोरोना रुग्णांना हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी मोफत अँम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) सेवेची सुरुवात आज रोजी कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, हाजीमलंग नदाफ, तिरुपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी, हारून शेख, श्रीकांत कोंडा, शाहू सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की सोलापूर शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी कोरोना संशयीत रुग्ण व कोरोना रुग्णांना व नातेवाईकांना होणारा त्रास विचारात घेत सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संशयीत रुग्ण व कोरोना रुग्णांसाठी मोफत अँम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) सेवेची सुरुवात केली आहे. यासाठी दोन रुग्नवाहिका सेवा देणार आहेत. ऑम्बुलन्स या सेवेद्वारे कोरोना संशयीत रुग्ण व कोरोना रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. मोफत अँम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) सेवेसाठी संपर्क प्रकाश वाले 8888802799, संजय देशपांडे 89751 93144, तिरुपती परकीपंडला 8888048808 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी केले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.