सौ.प्राजक्ताताई कोरे यांच्या शुभ हस्ते पेठ येथील पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ!


(राहुल दादा महाडिक यांच्या शुभ हस्ते सत्कार संपन्न.)


आज पेठ ता.वाळवा येथे वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या निवासस्थानी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.प्राजक्ताताई कोरे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांचा सत्कार भारतीय जनता युवामोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष मा.राहुल दादा महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पेठ गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेतुन मंजूर झालेल्या पेठ गावच्या पाणी पुरवठा योजनेचा पाणी पूजनाचा कार्यक्रम पार पडला.



यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य युवानेते मा.सम्राट बाबा महाडिक जि.प बांधकाम सभापती मा.जगन्नाथ आण्णा माळी व जिल्हा परिषद सदस्य मा.निजाम मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. 


या प्रसंगी शिराळ्याचे नगरसेवक मा.केदार नलवडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष मा.धनपाल माळी,युवानेते  मा.विकास दाभोळे, उपसरपंच मा.चंद्रकांत पवार मा.उपसरपंच मा.डि.के कदम मा.उपसरपंच अमिर ढगे,मा.उपसरपंच मा.शंकर पाटील,आनंदराव कदम,

राहुल पाटील,भानुदास गुरव,असिफ जकाते,विशाल शेटे,गोरख मदने, ग्रामसेवक एम.डी.चव्हाण,यांच्यासह जि.प चे व पंचायत समितीचे पदाधिकारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


तसेच यावेळी जि.प.अध्यक्षांनी

पेठ च्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती मीनाक्षीताई महाडिक व जि.प सभापती मा.जगन्नाथ आण्णा माळी यांच्या पाठपुराव्यामुळे गावामध्ये ८० लाख रु.खर्चून होनारे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेले आहे त्याचे काम सुरू झालेले आहे.त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. 


१ कोटी २५ लाख रु खर्चून ग्रामसचिवालय होणार आहे.त्याच त्याचबरोबर पेठ गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी ६० लाख रु.दलीत वस्तीसाठी ५८ लाख रु. मंजूर झालेले आहे.हि विकास कामे तातडीने पूर्ण करनार असून अजून निधी पेठ गावच्या विकासासाठी देनार असल्याचे जि.प अध्यक्षांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget