५ टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द (जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मोठी घोषणा)



सोलापूर // प्रतिनिधी

मागील एक ते दीड महिन्यापासून उजनी धरणाच्या पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न सर्व सोलापूर वासियांनी मोठ्या हिमतीने व धाडसाने उचलला होता व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांनी या पाच टीएमसी पाण्याला संपूर्णपणे विरोध केला होता यासाठी भारतीय जनता पार्टी बरोबर बरोबरच सर्व शेतकरी संघटनांनी याला विरोध केला होता तो निर्णय महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजकीय रद्दबातल केला असून यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे हा निर्णय मागेच घ्यायला पाहिजे होता पण थोडा उशीर झाला असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे मागील एक ते दीड महिन्याचा कालावधी पासून उजनीचा पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाजला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा घाट घातला होता त्याबाबत सर्व शेतकरी संघटनांनी व भारतीय जनता पार्टीने सुद्धा याला विरोध केला होता तो निर्णय अखेर आज रद्दबातल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री व सदैव सोलापूर जिल्हा लक्ष ठेवून असणारे अजित दादा पवार आता दत्तात्रय भरणे यांच्यावर कोणती कारवाई करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget