यंदाची आषाढी वारी तर होणार का नाही!




(सर्व वारकरी संघटनांमध्ये उत्सुकता)


सोलापूर // प्रतिनिधी

संपूर्ण देशात व महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षीपासून म्हणजे सन 2020ते 2021 पासून सध्याही कोरोना संसर्ग साथीच्या आजाराने थैमान घातले असल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन बंदच आहे परंतु वर्षभरात होणाऱ्या छोट्यामोठ्या यात्राही आजपर्यंत कोरूना संसर्ग साथीच्या आजारांमुळे प्रशासनाने बंद ठेवले आहेत. परंतु नेहमीचे नित्य पूजाअर्चा हे मात्र सातत्याने सुरू ठेवण्यात आले आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोना संसर्ग साथीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असलेले संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रा देवस्थान मंदिर प्रशासनाने बंद केल्यामुळे गेल्या दीड वर्षात एक ही यात्रा होऊ शकली नाही. यावर्षी मात्र आषाढी एकादशी यात्रा उत्सव संपन्न होईल अशी सर्वांना पुन्हा एकदा कोरूना च्या दुसऱ्या लाटेने डोकेवर काढल्यामुळे पहिल्या पेक्षाही कोरोनाच्या दुसऱ्याला तलाटेमुळे आधीच जास्त नागरिकांचे बळी गेल्यामुळे यंदाचीही आषाढी वारी होणार नसल्याची चिन्हे दिसून येत असल्यामुळे यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी वारी वर कोरोनाचे सावट असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget