वृत्तसंस्था // प्रतिनिधी
देशाच्या चलन प्रणालीमधून लवकरच 2 हजारांच्या नोटा हद्दपार होण्याची शक्यता आहे. कारण, आता 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हळूहळू चलन प्रणालीमधून 2 हजार रुपयांच्या नोटा काढण्यास सुरूवात केली आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षात 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा आरबीआयने केली आहे. मागील वर्षी देखील आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. हा अहवाल 26 मे 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
भारतात नोटाबंदी केल्यानंतर 2016 मध्ये चलनात 2 हजार रुपयांची नोट आणली होती. परंतु मोठी मूल्यवान नोट असल्याने ही बनावट चलन बाजारात जाण्याचा धोकाही जास्त आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2021 मध्ये एकूण पेपर रोख 0.3 टक्क्यांनी घटून 2,23,301 लाख युनिट्सवर पोचली. मूल्याच्या दृष्टीने मार्च 2021 मध्ये 4.9 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारच्या नोट चलन प्रणालीमध्ये होत्या, तर मार्च 2020 मध्ये त्याचे मूल्य 5.48 लाख कोटी रुपये होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.