जऊळका ग्रामसेवक चार महिन्यापासून हरवला आहे अशी तक्रार ग्रा पं सदस्यांनी केली




कोरोणा कालखंडामध्ये जऊळका ग्रामपंचायत मधे ग्रामसेवक विनायक वायाळ यांनी मनमानी कारभार करून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणे चालू केलेले आहे आणि म्हणून त्वरित ग्रामसेवकाची बदली करून कर्तव्यदक्ष ग्रामसेवक गावाला देण्याची ग्रामपंचायत सदस्यांनी आज अकोट गटविकास अधिकारी शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे या तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्यास ग्रामपंचायत सदस्य करतील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण



 अकोट - जऊळका ग्रामपंचायत सदस्य गेल्या चार महिन्यापासून जऊळका ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या विनायक वायाळ नामक ग्रामसेवाकाला त्रस्त झाले असून वायाळ यांनी मनमानी कारभार चालू केलेला आहे गेल्या चार महिन्यांपासून फक्त तीन वेळ ग्रामपंचायतला धावती भेट दिलेली आहे. जनतेच्या आरोग्य करीता आलेला 14व्या वित्त आयोगाचा निधी अजून पर्यंत खर्च केलेला नाही ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार ग्रामसेवकांना विनंती केल्यानंतरही हेतुपुरस्कर ग्रामसेवकाने हा निधी खर्च केलेला नाही त्यामुळे गावकर्‍यांची विनाकारण नाराजी ग्रामपंचायत सदस्यांवर येत आहे. कोरोना कालखंडात गावामध्ये काही पेशंट निघाल्या नंतरही ग्रामपंचायत च्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम ग्रामसेवकाच्या गैरहजेरीमुळे राबवता येत नाहीत, गावातील अडचणी समजून घेण्याकरिता गावामध्ये बोलावले असता ग्रामसेवक अरेरावी करून सांगतात मी गावात येऊ शकत नाही तुमची गरज असल्यास तुम्ही आकोट ला या, गावातील काही मोजक्या लोकांच्या संपर्कात राहून त्यांना बोलावून एक तर्फी कामे करण्याचे ही निदर्शनास आलेले आहे, गेलेल्या २४ -५-२०२१ ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत कर्मचारी नारायण खंडेकार परस्पर अकोटला ग्रामसेवकाने बोलवून आपल्या मोजक्याच लोकांच्या  घरकुलांच्या प्रस्तावावर सह्या दिलेले आहेत आणि इतर मंडळी तशीच राहिलेली आहे, दलित वस्तीतील काम चालू असता ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकाला बोलावले असता ते माझे काम नाही मी येऊ शकत नाही आणि मला वेळ नाही अशा पद्धतीचे उडवाउडवीची उत्तरे देतात, ग्रामस्थांच्यावतीने गावात कोरोना सेंटर उघडायचे होते पण ग्रामसेवकाची साथ नसल्यामुळे ग्रामस्थ मंडळी मधून नाराजीचा सूर निघत आहे, पोखरा समिती करीता वारंवार विनंती करूनही समिती स्थापन न केल्यामुळे लाभार्थी वंचित राहत आहेत आणि ग्रामसेवकाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष आहे याबद्दल विचारणा केली असता ग्रामसेवक कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करत नाहीत उलट तुमच्याकडून माझे काय बरेवाईट होईल ते करून घ्या अशा प्रकारची धमकी देतात आणि माझे हात खूप वरपर्यंत आहेत असे सांगतात आणि म्हणून आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी यांना त्रस्त झालेले आहोत म्हणून आपणास आमची नम्र विनंती आहे की विद्यमान ग्रामसेवक जऊळका ग्रामपंचायत मधून यांची बदली करून जेणे करुन आमच्या जऊळका गावाचा विकास होईल अशा पद्धतीचे कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक आमच्या गावाला देण्यात यावे हि नम्र विनंती करण्यात येत आहे . आमच्या या तक्रारीची आपण गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्ही ग्रामपंचायत सदस्य तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू तरी आपण आमच्यावर ती वेळ येऊ देऊ नये ही नम्र विनंती अशा विषयाचे निवेदन अकोट गटविकास अधिकारी शिंदे साहेब यांना देण्यात आले व या निवेदनाच्या प्रती लिपी अकोला पालकमंत्री माननीय श्री बच्चू भाऊ कडू साहेब,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला येथे बाय पोस्ट देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी उपसरपंच दिपक शेटे, संजय इंगळे,सौ छाया प्रवीण अंभोरे, सौ सुप्रिया निलेश धांडे, सौ सुशीला जगदेव अवचार, सुजित पुरूषोत्तम तांदळे हे ग्रा पं सदस्य व प्रकाश भाऊ घनबहादुर,वसतराव शेटे, प्रफुल्ल काठोळे,अरुन सोनटक्के,जगदेवराव अवचार,मनोहर भारसाकळे ही ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget