मंगळवेढा शहरातील सर्व नाले,गटारी व नागरी गटारी साफ सफाई कराव्यात शिवबुध्दचे अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे


पंढरपूर // प्रतिनिधी

मंगळवेढा शहरातील सर्व नाले गटारी  गटारी नागरी आणि सार्वजनीक गटारींची मान्सून पर्व साफ -सफाई करण्यात यावी.उन्हाळा संपत आला आहे तसेच लवकरच पावसळ्यास सुरवात होत आहे.याचे चिन्हे दिसत आहेत. तसेच आपल्या मंगळवेढा शहरातील मनपाकडून दरवर्षी मानसुन सुरू व पुर्व शहरातील सर्व नाले नागरी गटारांची साफ सफाई करण्यात येत असते.परंतू तरी देखील नगरपरिषदने साफ सफाई व स्वच्छता करून घ्याव्यात.कारण मंगळवेढा  शहरातील काही भागातील गटारी व ड्रेनीज तुबंल्या जात आहेत.सध्या संपूर्ण देशात कोरोना या साथ
विकाराचा फैलाव झाला आहे.व त्यामुळे आपले मंगळवेढा रेड झोनमध्ये आले आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा जिवजंतू,डास,
मच्छर, चिलेट या जिवजंतूचा जनन व प्रजननाचा काळ पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरू होतो.या सदरील जिवजंतूचा अधिवास हा नाले गटारी
नागरी गटारी,तसेच पाण्याच्या डबक्यांच्या ठिकाणी सर्वाधिक असतो.पावसाळ्याच्या सुरुवातीला दरम्यानच्या काळात डेंग्यु,मलेरिया ताप,सर्दी,खोकला व तस्तम विकारांचा फैलाव होताना दिसून येतो.त्यामुळे मंगळवेढा शहरातील सर्व नाले नागरी गटारीची साफ सफाई करून घेण्यात याव्यात.तसेच मंगळवेढा शहरातील दामाजी चौक ते शिवप्रेमी चौकापर्यत या भागातील रस्ते खराब दुरूस्ती करून घ्यावे.अशी मागणी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मंगळवेढा नगरपरिषदकडे करण्यात आली आहे.तरी मुख्याधिकारी पल्लवी पाटील साहेब यांनी जातीने लक्ष घालून मंगळवेढ्यातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा.असे ही प्रसिद्धपत्रात म्हटले आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget