वृत्तसंस्था // प्रतिनिधी
इंडस्ट्रीयल असोशिएनच्या ऑफ टेंभुर्णी एमआयडीसीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०४ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
जागतिक कोरोना विषाणूच्या संसर्गाने सुरू असलेल्या महामारीच्या आजारातून बरे होण्यासाठी रक्तातील प्लाजमाची आवश्यकता भासत आहे.त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी असोशियन टेंभूर्णीच्या वतीने सर्व एमआयडीसी'तील उद्योजक व कंपनीतील कामगार यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.उद्योजक अमोलशेठ जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात २०४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.तसेच सर्व रक्तदात्यांना हेल्मेट व एक पाण्याचा जार हे भेट देण्यात आले.तसेच अश्विनी हॉस्पिटलचे डॉ.मामासाहेब पाडुळे यांनी आर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथी औषधं शरीरात कसे काम करते हे सांगून तीनशे जणांना मोफत दिले.
शिबिराचे उदघाटन पो नि राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ए पी आय राजेंद्र मगदूम,हवेली पंचायत समितीचे सभापती अण्णासाहेब महाडिक,उद्योजक अमोल जगदाळे,युवा उद्योजक बाळासाहेब ढेकणे,वंचित आघाडीचे अतुल खुपसे,बशीर जागीरदार,असोसिएशन ऑफ टेंभुर्णी एमआयडीसीचे अध्यक्ष राजेंद ढेकणे,उपाध्यक्ष राजू येवले,सचिव प्रवीण खांडेकर,विक्रम भोसले,अमित पूरवत, सुदर्शन भिस्ते,अनिल घोळवे,संतोष जाधव,
यांच्यासह मान्यवर,उद्योजक,रक्तदाते उपस्थित होते.अश्विनी ब्लड बँक सोलापूर व पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर यांनी रक्तसंकलन केले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.