न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये "कॕपस प्लेसमेंटसाठी तयारी कशी करावी" या विषयावर वेबिनार संपन्न.



वृत्तसंस्था // प्रतिनिधी

न्यु सातारा पॉलिटेक्निक, कोर्टी येथे मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाने ' How to prepare for campus placement' या विषयावर वेबिनारचे आयोजन दिनांक २७ मे रोजी केले होते. सध्याच्या लॉकडाऊन परस्थितीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक  तयारी करून घेणे शक्य नसल्याने हा उपक्रम सुरु केले आहे. यासाठी मार्गदर्शक म्हणून  डॉ. माधव राऊळ (प्लेसमेंट अधिकारी, माळेगाव अभियांत्रकी महाविद्यालय)  लाभले होते.
या ऑनलाइन चर्चासत्राचे प्रसारण झूम या अॅपच्या माध्यमातून विनाशुल्क होता. वेबिनारमध्ये डॉ. राऊळ यांनी डिग्री व डिप्लोमा अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा, मुलाखती यांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केले. या वेबीनार मध्ये १७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या वेबिणारचे  समन्वयक म्हणून प्रा. राकेश अष्टेकर यांनी काम पाहिले.याच बरोबर ३१मे रोजी कॉप्युटर विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारला देखील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्राचार्य प्रा. विक्रम लोंढे यांनी केले.
या सत्रात मार्गदर्शनासाठी डॉ. राऊळ यांचे आभार प्रा.अष्टेकर यांनी मानले तसेच या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजाराम निकम व सचिव श्री. ज्ञानेश्वर शेडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget