पंढरपूर // प्रतिनिधी
सरकार कोविड 19 बाबत उपाययोजना करण्यासाठी अपयशी ठरल आहे. सरकार आता खाटेवर आल्याच जर सामना दैनिकास वाटत असेल तर ते ताठीवर जायला आता तीन चार महिने पुरे आहेत, अशी जळजळीत टीका भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेनं काँग्रेसवर टीका केल्यामुळे भाजपच्या हाती आयते कोलीत लागले आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकेल याचं भाकितच वर्तवलं आहे.
'महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस वाढली आहे. त्यामुळे सरकार हे आता खाटेवर आलं आहे. बहुतेक सरकार चालवण्याचा लोड तिन्ही पक्षांना झापत नाही, असं आता दिसून येत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात प्रचंड कुरबुरी वाढल्या आहे. त्यामुळे या कुरबुरीतून डाव मोडायचा असं चित्र आज सामनाच्या लेखातून दिसून आलं आहे', अशी टीका निंबाळकर यांनी केली.
तसंच, 'कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे सर्वात अपयशी ठरले आहे. योग्य प्रकारे नियोजन करता आले नाही. अलीकडे कोरोनाबाधित मृत रुग्णांचे आकडे लपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून सरकारचा आटोपण्याचा डाव आहे', निंबाळकर यांनी केला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.