पंढरपूर // प्रतिनिधी
शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महिला आघाडीची आज पंढरपूर येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.या मिटींगमध्ये बीड शहर व तालुक्यातील दुष्काळ भागातील अनेक प्रश्न आणि महिला,युवती
युवक,आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.
यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक संदिपराजे मुटकुळे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अनुराधा देशमुख,
सोलापूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार साठे तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वप्नाली अनिल साठे यांच्या आदेशावरून मराठवाडा अध्यक्षापदी मा.सौ.किसकींदा दिलीप पांचाळ यांची निवड करण्यात आली. आपण यापुढे जनसामान्यांचे,
अपंग,मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी, शेतमजुर,विद्यार्थी विद्यार्थीनी,महिला वर्गाला व बेरोजगारांना न्याय मिळवून दिला जाईल,सर्व प्रश्न सोडवले जातील.असे किसकींदा पांचाळ म्हणाल्या.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षापदी मा.सौ.किसकींदा पांचाळ यांची एकमतानी निवड करण्यात आली.यावेळी निवडचे पत्र देताना शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे मोहोळ तालुकाध्यक्ष अर्जुन चवरे, मोहोळ तालुकाध्यक्षा मंगलाताई दत्तात्रय गवळी,पंढरपूर तालुकाध्यक्ष गणेश वाघमारे,यांच्या आदेशखालील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.