सोलापूर // प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून माढा तालुक्यातील लऊळ,तुळशी, कुर्डू, तडवळे म, या 4 गावांसाठी 11 कोटी 31 लाख 95 हजार रूपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले की, माढा तालुक्यातील काही गावांना दुष्काळाच्या झळा तीव्र स्वरूपाच्या जाणवत आहेत. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. माढा तालुक्यातील मौजे लऊळ, तुळशी , कुर्डू, तडवळे म.या गावांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पिण्याचे पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना होणेसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे मागणी केली होती.या गावांतील पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यामुळे नागरीकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार असून पाण्याची अडचण दूर होणार आहे.
माढा तालुक्यातील मौजे तडवळे (म) - 26 लाख 11 हजार रुपये, मौजे लऊळ - 3 कोटी 35 लाख 54 हजार रुपये, मौजे कुर्डू - 4 कोटी 62 लाख 6 हजार रुपये व मौजे तुळशी - 2 कोटी 7 लाख 83 हजार असा एकुण 11 कोटी 31 लाख 95 हजार रूपयाचा निधी मंजूर झालेला असून योजनेच्या कामास लवकरच सुरू होणार आहेत. या कामासाठी निधी उपलब्ध करणेसाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आ. बबनराव शिंदे व आ. संजयमामा शिंदे यांनी सतत पाठपुरावा करून निधी मंजूर केल्यामुळे या गावांतील पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू होणार आहेत.
चौकट
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर करणेसाठी करमाळा माढा मतदारसंघाचे आ.संजयमामा शिंदे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडे मार्च महिन्यात मीटिंग लावलेली होती. त्यामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सदर गावांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करणेबाबतच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते त्यास माढा तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.