सोलापुर // प्रतिनिधी
पूर्व भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगर पालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे उद्दघाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, परिवहन सभापती जय साळुंखे, सदस्य गणेश साळुंखे, अशोक यनगंटी, माजी नगरसेवक उमेश मामडयाल, आनंद कंदीक़टला, किरण वल्लाल, नागेश म्याकल, बालू चक्राल, शुभम यक्कलदेवी, काशीनाथ आनंदकर, शेखर चौगुले, प्रकाश अप्पम, आदिंच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आले. या शिबिरास सोलापूर महापालिका परिवहन समिति व सोमपा आरोग्य विभाग डॉक्टर सहाना शेख, त्यांचे असिस्टण्ट स्मिता आंबेकर, रजनी मोरे, तसेच परिवहन कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरात रुगणांना ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजाराचे तपासणी करुन वैद्यकीय सुविधा, औषधे देण्यात आले.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधताना पूर्व भागातील बहुसंख्य गोरगरीब जनता, विडी, यंत्रमाग, बांधकाम, असंघटित क्षेत्रात काम करत असून या भागात कोरोना चा प्रादुर्भाव जास्त आहे सरकार आणि प्रशासन यावर काम करत असुन, तसेच पूर्व भागातील नागरिकांच्या तपासणीसाठी लवकरच एक्स रे मशीन ची सोय होणार असुन त्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनीही आरोग्यची काळजी घेण्याचे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.